'मी बेडमध्ये तुला मख्खन-मलई वाटते, आणि आता मात्र...', माजी क्रिकेटर मुनाफ पटेलचं नाव घेत बॉबी डार्लिंगने धुरळाच उडवला
Bobby Darling and Munaf Patel: माजी क्रिकेटर मुनाफ पटेल याच्यासोबत आपण वन नाइट स्टँड केलं असा खळबळजनक दावा बॉबी डार्लिंग हिने केला आहे. पाहा ती नेमकं काय म्हणाली.
ADVERTISEMENT

मुंबई: बॉलिवूड आणि छोट्या पडद्याची प्रसिद्ध ट्रान्सजेंडर अभिनेत्री बॉबी डार्लिंग तिच्या स्पष्टवक्ते विधानांमुळे आणि बोल्ड स्टाईलमुळे नेहमी चर्चेत असते. तिचा अभिनय आणि स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेली बॉबी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण यावेळी कारण काही वेगळेच आहे. अलीकडेच बॉबी डार्लिंगने एका मुलाखतीदरम्यान एक अत्यंत खळबळ उडवून देणारा खुलासा केला आहे. तिने दावा केला की, तिचं एका प्रसिद्ध क्रिकेटपटूसोबत 'वन-नाईट स्टँड' होतं. तसेच ती म्हणाली की तिला त्याच्याबाबत प्रेम वाटत होतं. तिने स्पष्ट केलं की, ती रिलेशनशिपमध्ये नव्हती, पण खूप जवळ आली होती.
तो प्रसिद्ध क्रिकेटपटू कोण?
'बॉलिवूड ठिकाना' या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत तिने दावा केला की, तिचं माजी भारतीय वेगवान गोलंदाज मुनाफ पटेलसोबत वन-नाईट स्टँड होतं. बॉबीने मुलाखतीत सांगितले की त्यावेळी ती आणि मुनाफ मित्र होते. दोघेही एका क्लबमध्ये भेटले होते, जिथे ते एकत्र पार्टी करत होते आणि क्लबिंग करत होते. तिने सांगितले, 'त्या रात्री आम्हाला अनेकांनी एकत्र पाहिले.
हे ही वाचा>> मोठं कांड! बायको निघाली मास्टरमाईंड, प्रियकरासाठी केला पती आणि सासूचा खून, कारण ऐकून हादरून जाल?
मुलाखतीत नेमकं काय म्हणाली बॉबी डार्लिंग?
'आम्ही मित्र होतो, एका क्लबमध्ये भेटलो होतो. त्यानंतर आम्ही क्लबिंग केलं आणि पार्टी करून आलो. बहुतेक लोकांनी पाहिलं असेल की, कोणासोबत बोलताना किंवा तोंडून निघून गेलं असेल बोलता-बोलता.. की, मी मुनाफ पटेलला भेटले म्हणून.. आम्ही एकत्र पार्टी केली.. बहुतेक लोकांनी त्याचा चुकीचा अर्थ काढला असेल. कारण त्यावेळी माझी इमेज ही फर्ल्टीशियस अशी होती.'
'रिलेशनशिप होती की नाही हे नाही मी बोलणार.. पण माझी अटॅचमेंट झाली होती त्याच्याशी.. कारण आम्ही भेटलो होतो.. दोन व्यक्ती तेव्हाच भेटतात जेव्हा त्यांना एकमेकांबाबत आकर्षण वाटत असतं. आधी आकर्षण वाटतं आणि नंतर प्रेम होतं.'
हे ही वाचा>> शिक्षिकेचा विद्यार्थ्यावर जडला जीव, विद्यार्थ्याच्या प्रेमात मॅडम करून बसल्या भलतंच काही अन्..
'प्रेम होतं पण.. मी आता त्याला काय बोलू.. चला हेच बोलते की, बहुतेक 'वन नाइट स्टँड' होतं.'
'त्याला खरं तर राग आला होता जेव्हा मी मीडियामध्ये मुलाखत देताना सांगितलं होतं की, हो आमचं होतं.. तर काय? होतं.. तेव्हा तो म्हणाला की, मला तुझ्याकडून ही आशा नव्हती. असं नव्हतं करायलं हवं तू, माझी किती बदनामी होईल. सगळ्या क्रिकेट टीममध्ये वैगरे..'
'त्यावेळी मी त्याला म्हटलं की, जेव्हा मी तुला फोन करते तर तू माझा फोन उचलत नाही.. मी आता एवढी घाणेरडी झालीए.. पण बेडमध्ये तर मी तुला मख्खन-मलई वाटते?' असं म्हणत बॉबी डार्लिंगने खळबळ उडवून दिली आहे.
बॉबी डार्लिंगचा गौप्यस्फोट पण मुनाफ पटेलचं मौन
सध्या या संपूर्ण प्रकरणावर मुनाफ पटेलकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. बॉबी डार्लिंगच्या दाव्याबाबत त्याने कोणतेही विधान केलेले नाही किंवा सोशल मीडियावरही त्याने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण बॉबी डार्लिंगच्या या स्पष्टवक्ते विधानाने खळबळ उडवून दिली आहे.