मोठं कांड! बायको निघाली मास्टरमाईंड, प्रियकरासाठी केला पती आणि सासूचा खून, कारण ऐकून हादरून जाल?
Crime News : पत्नीनेच आपल्या सासूचा आणि पतीचा खून केला. त्यानंतर पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. खून केलेल्या पत्नीचं नाव बंदना असल्याची माहिती समोर येत आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

गुवाहाटीत एक धक्कादायक घटना

प्रियकराला जवळ करत पतीची हत्या
Crime News : गुवाहाटीत एक धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीनेच आपल्या सासूचा आणि पतीचा खून केला. त्यानंतर पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. खून केलेल्या पत्नीचं नाव वंदना असल्याची माहिती समोर येत आहे. पण तिच्या पतीचा आणि सासूचा पोलिसांनी शोध घेतला. मात्र, ते दोघेही सापडले नाहीत. दरम्यान, या घटनेचं पितळ उघडलं पडलं आहे.
हेही वाचा : तरुण आणि तरुणीच्या अनैतिक संबंधातून बाळाचा जन्म, नंतर बाळाला मारलं अन् हाडं बॅगेत भरून...
नूनमती पोलीस ठाण्यात वंदनाने अमरज्योती आणि शंकरी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर अमरज्योतीच्या चुलत भावाने दुसरी तक्रार दाखल केली. या दोन्ही तक्रारीवरून हा कट वंदनानेच तर रचला नसेल ना? असा पोलिसांनी संशय व्यक्त केला.
14 फेब्रुवारी 2023 मध्ये वंदना पुन्हा एकदा नूनमती पोलीस ठाण्यात पोहोचली असता, तिने पोलिसांना तिच्या पती आणि सासूबद्दल विचारले. तेव्हा पोलिसांनी वंदनावर हत्येचा संशय व्यक्त केला आहे. पोलीस तिच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होते. पोलिसांनी वंदनाची संपूर्ण माहिती काढली असता, नंतर एके दिवशी वंदनाला चौकशीसाठी बोलावले. वंदनाची सलग दोन दिवस चौकशी करण्यात आली. त्यानंतर अखेर हे सत्य बाहेर आलेच.
नेमकं प्रकरण काय?
सुमारे बारा वर्षांपूर्वी वंदना आणि अमरज्योती यांनी त्यांच्या कुटुंबाच्या विरोधात जावून लग्न केलं होतं. शंकरला हा विवाह मान्य नव्हता. परंतु नंतर तिने तिच्या सुनेला स्वीकारण्यास सुरुवात केली. अमरज्योती यांच्यात सतत भांडणे होत असत. शंकरी तिच्या मुलाला आणि सुनेला आर्थिक मदतही करायची. पण काही महिन्यानंतर वंदना आणि अमरज्योती यांच्यातील वाद वाढू लागला आणि हे प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचलं.
शंकरी निवृत्त सरकारी कर्माचारी होती. शिवाय, गुवाहाटीला नूनमती येथील पाच मजल्याच्या इमारतीतील फ्लॅटची मालकीण होती. तिने हा प्लॅट भाडेतत्वावर दिला होता, ज्यामुळे तिला चांगलं आर्थिक उत्पन्न मिळत होतं. शिवाय शंकरीच्या नावावर एक जमीन होती. त्या जमिनीची किंमत खूप जास्त होती. वंदनाला माहिती होते की, शंकरी आणि अमरज्योतीनंतर ही मालमत्ता तिलाच मिळू शकते. यामुळेच तिनं कधी पतीला घटस्फोट दिला नाही.
मैत्रिणींना सोबत घेऊन काढला काटा
तिनं सासू आणि पतीचा काटा काढण्यासाठी दोन मैत्रिणी, धन्ती आणि अरुप यांना सोबत घेतलं. त्यानंतर सुनियोजितपणे हत्येचा कट रचला. वंदना ही केवळ योग्य संधीची वाट पाहत होती. 26 जुलै 2022 मध्ये दुपारच्या वेळी शंकरी अमरज्योती आणि वंदना हे वेगवेगळ्या फ्लॅटमध्ये राहू लागले. शंकरीला तिच्या सूनेनं तिच्यासाठी काय योजना आखली याची काहीही कल्पना नव्हती. ती तिच्या खोलीत आराम करत बसली होती. त्यावेळी वंदना तिथे पोहोचली, त्यानंतर ती बेडवर चढली, शंकरीच्या चेहऱ्यावर उशी ठेवली आणि शंकरीला गुदमरून मारण्याचा प्रयत्न केला. शंकरीची धडपड सुरू झाली, पण वंदनाने तिला सोडलं नाही. थोड्याच वेळा शंकरीनं अखेरचा श्वास घेतला. यावेळी तिथे काही महिला उपस्थित होत्या.
वंदनाने शंकरीच्या मानेवर रोलिंग पेन फिरवला. त्याने शंकरीच्या शरीराचे तुकडे केले. त्यावेळी शंकरीचा मृतदेह हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. नंतर वंदनाने रक्त पुसले आणि मृतदेह गुंडाळला आणि एका गाडीत ठेवला, तेव्हा मृतदेह मेघालयात फेकून दिला.
हेही वाचा : मुलीने अल्पवयीन मुलाला भेटायला टेरेसवर बोलावले, डेटिंगचा विषय काढताच मुलाची सटकली अन्..
तपासादरम्यान, पोलिसांनी मेघालयातून मृतदेहांचे अवयव जप्त केले. चौकशीसाठी गुवाहाटी पोलिसांनी आरोपींना शेजारच्या राज्यात नेण्यात आले. शंकरी आणि अमरज्योतीचे मृतदेह फेकले. या कमासाठी मेघालय पोलिसांची मदत घेण्यात आली. प्रथम चेरापुंजीजवळ खासी हिल्समधून शंकरीच्या मृतदेहाचे अवयव जप्त केले. नंतर पोलिसांनी दुसऱ्या ठिकाणाहून अमरज्योतीच्या मृतदेहाचे अवयव देखील जप्त करण्यात आले.