शिक्षिकेचा विद्यार्थ्यावर जडला जीव, विद्यार्थ्याच्या प्रेमात मॅडम करून बसल्या भलतंच काही अन्..
मध्य प्रदेशातून विद्यार्थ्याच्या प्रेमात वेडी झालेल्या एका शिक्षिकेनं गळफास घेऊन स्वत:चं आयुष्य संपवल्याचं वृत्त समोर आलं आहे. नेमकं काय घडलं? सविस्तर जाणून घ्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

कॉलेजच्या विद्यार्थ्यावर शिक्षिकेचं जडलं प्रेम

लग्नासाठी नकार मिळताच शिक्षिकेनं संपवलं आयुष्य...
MP News: मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातून सर्वांनाच चकित करणारी बातमी समोर आली आहे. एका कॉलेजमधील शिक्षिका आपल्याच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या प्रेमात पडली आणि तिने त्याला लग्नाची मागणी घातली. मात्र, विद्यार्थ्याच्या प्रेमात वेडी झालेल्या या शिक्षिकेनं गळफास घेऊन स्वत:चं आयुष्य संपवल्याचं वृत्त समोर आलं आहे. नेमकं काय घडलं? सविस्तर जाणून घ्या.
मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेतील मृत महिलेचं नाव प्रिया यादव असून ती पुनासा येथील आयटीआय कॉलेजमध्ये गेस्ट प्रोफेसर म्हणजेच अतिथी शिक्षिका म्हणून कार्यरत होती. कॉलेजमधील विद्यार्थ्याच्या प्रेमात पडलेल्या या शिक्षिकेने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी घटना घडली त्यावेळी त्या शिक्षिकेच्या खोलीमध्ये आयटीआय कॉलेजचा विद्यार्थी देखील उपस्थित होता. सपन यादव असं त्या विद्यार्थ्याचं नाव असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या घटनेनंतर त्यानेच शिक्षिकेला रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यावेळी तिथल्या डॉक्टरांनी शिक्षिकेला मृत घोषित केले.
हे ही वाचा: तरुण आणि तरुणीच्या अनैतिक संबंधातून बाळाचा जन्म, नंतर बाळाला मारलं अन् हाडं बॅगेत भरून...
विद्यार्थी आणि शिक्षिकेचे प्रेमसंबंध
पुनासा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षिका रीवा जिल्ह्यातील नर्मदापुरम परिसरात एका भाड्याच्या घरात राहत होती. कॉलेजमधील मॅकेनिकल इंजिनीयरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या सपन यादव या विद्यार्थ्यासोबत तिचे प्रेमसंबंध होते. शुक्रवारी सपन त्या शिक्षिकेच्या म्हणजेच प्रियाच्या घरात तिला भेटण्यासाठी गेला होता आणि त्यावेळी दोघांमध्ये त्यांच्या लग्नाबद्दल बोलणं झालं.
हे ही वाचा: मुलीने अल्पवयीन मुलाला भेटायला टेरेसवर बोलावले, डेटिंगचा विषय काढताच मुलाची सटकली अन्..
विद्यार्थ्याने नकार देताच शिक्षिकेने उचललं टोकाचं पाऊल
विद्यार्थ्याने त्याचं शिक्षण होईपर्यंत लग्न करणार नसल्याचं शिक्षिकेला सांगितलं. आत्ताच लग्न करणाऱ्याला विद्यार्थ्याने नकार दिल्यामुळे त्या दोघांमध्ये वाद सुरू झाला. याच वादामुळे प्रियाने दुसऱ्या खोलीत गळफास लावून स्वत:चं आयुष्य संपवलं. पोलिसांनी सपनला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी केली जात आहे. तपास करताना पोलिसांना घटनास्थळावरून कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही.