Narendra dabholkar murder case verdict : दाभोलकर हत्या प्रकरणात दोघांना जन्मठेप! तिघे निर्दोष
Narendra Dabholkar murder case verdict : दाभोलकर हत्या प्रकरणात सचिन अंदुरे, शरद कळसकर यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा ११ वर्षानंतर निकाल

तीन आरोपींची निर्दोष सुटका

दोघांना सश्रम जन्मठेप आणि प्रत्येकी पाच लाखांचा दंड
Narendra Dabholkar murder Verdict News : (ओंकार वाबळे, पुणे) डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने आज निकाल दिला. न्यायालयाने तीन आरोपींची निर्दोष सुटका केली. दोन जणांना दोषी ठरवत जन्मठेप आणि प्रत्येकी पाच लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. (Sharad kalaskar and Sachin andure who shot Narendra Dabholkar sent to life time imprisonment)
दाभोलकर हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड वीरेंद्र तावडे हा असल्याचे आरोपपत्रात म्हटलेले आहे. पण, त्याच्याविरोधात शंका उपस्थित झाल्या. गुन्ह्यात मुख्य सहभाग असल्याचा हेतू व्यक्त होतो आहे, असे सांगत न्यायालयाने पुराव्याअभावी तावडेला निर्दोष मुक्त केले.
विरेंद्रसिंह तावडेवर कट रचल्याचा आरोप आहे. परंतु सरकारी पक्ष पुरावे सादर करण्यात अपयशी ठरले. त्याचबरोबर विक्रम भावे आणि ॲड. संजीव पुनाळेकर यांच्याविरोधात आरोप सिद्ध करू न शकल्याने न्यायालयाने त्यांनाही निर्दोष सोडले. म्हणजेच या प्रकरणातील पाच पैकी तीन आरोपींची निर्दोष सुटका झाली.
सचिन अंदुरे (छत्रपती संभाजीनगर), शरद कळसकर (जालना) यांनी दाभोलकर यांची हत्या केल्याचे सिद्ध होत असल्याचे सांगत न्यायालयाने दोषी ठरवले. या प्रकरणात फाशीची शिक्षा होऊ शकत नाही, असे न्यायालयाने निकालात सांगताना दोघांना सश्रम जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. त्याचबरोबर दोघांना प्रत्येकी पाच लाख रुपये दंड ठोठावले आहे.