Govt Job: सरकारी बँकेत ऑफिसरच्या हजारो पदांसाठी भरती; कधीपर्यंत कराल अर्ज?

मुंबई तक

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) कडून प्रोबेशनरी ऑफिसर (PO) आणि मॅनेजमेंट ट्रेनी (MT) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

सरकारी बँकेत ऑफिसरच्या हजारो पदांसाठी भरती
सरकारी बँकेत ऑफिसरच्या हजारो पदांसाठी भरती
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सरकारी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी

point

IBPS कडून ऑफिसर पदांसाठी मोठी भरती

point

कधीपर्यंत कराल अर्ज?

IBPS Recruitment: सरकारी बँकेत नोकरी मिळवण्यासाठी बरेच तरुण प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळतं. अशा तरुणांसाठी सरकारी बँकेतील ऑफिसरच्या हजारो पदांसाठी भरतीचं नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलं आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) कडून प्रोबेशनरी ऑफिसर (PO) आणि मॅनेजमेंट   ट्रेनी (MT) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. 

या भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया 1 जुलै 2025 पासून सुरू करण्यात आली असून उमेदवार 15 जुलै 2025 पर्यंत अर्ज करु शकतात. या भरतीसाठी इच्छुक उमेदवार ibps.in या IBPS च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन अर्ज भरू शकतात. या भरतीअंतर्गत देशभरातील विविध सरकारी बँकेत ऑफिसर पदासाठी नियुक्त्या केल्या जातील.  यासाठी पात्र उमेदवार ऑनलाइन माध्यमातून अर्ज करु शकतात.

शैक्षणिक पात्रता 

या भरतीच्या माध्यमातून बँकेतील ऑफिसर पदाच्या एकूण 5208 जागा भरल्या जातील. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. पदानुसार, संबंधित क्षेत्रात डिप्लोमा किंवा पदव्युत्तर पदवी देखील अनिवार्य असू शकते. 

हे ही वाचा: बंद खोलीत 7 महिन्याच्या गरोदर महिलेसोबत तांत्रिकाने... भूतबाधेच्या नावाखाली भयानक प्रकार

वयोमर्यादा

या भरतीसाठी वयोमर्यादा 1 जुलै 2025 तारखेला अनुसरून किमान 20 वर्षे आणि कमाल 30 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. तसेच, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट दिली जाईल.

हे वाचलं का?

    follow whatsapp