कोकणातील 'या' जिल्ह्यात येलो अलर्ट, पुणे साताऱ्यात मान्सूनची परिस्थिती काय?
Maharashtra Weather Update : राज्यातील हवामानाच्या सविस्तर अंदाजानुसारस, 3 जुलै रोजी विशेष म्हणजे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाच्या शक्यतेचा अंदाज वर्तवला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

महाराष्ट्रातील हवमानाचा सविस्तर अंदाज

कोकणातील 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट
Maharashtra Weather Update : राज्यातील हवामानाच्या सविस्तर अंदाजानुसारस, 3 जुलै रोजी विशेष म्हणजे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) नमूद केलं की, उत्तर-पश्चिम, मध्य आणि पूर्व भारतात मान्सून सक्रिय राहील. तसेच मध्य महाराष्ट्रात 2 जुलैपासून 6 ते 7 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
हेही वाचा : 'दीर आणि मेव्हण्यासोबत माझे संबंध...', महिलेच्या अनैतिक संबंधांची कहाणी ऐकून तुम्हीही चक्रावून जाल!
कोकणातील 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट
कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगड आणि रत्नागिरीत पूरजन्य परिस्थितीचा हवामान खात्याने धोका वर्तवला आहे. हवामान विभागाने मुंबई, रायगड आणि रत्नागिरीसाठी येलो अलर्ट जारी केला आहे.
मध्य महाराष्ट्रात मान्सूनची स्थिती
मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांचा समावेश होतो. यापैकी घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुणे आणि साताऱ्यात 40 - 120 मिमी पाऊस अपेक्षित असणार आहे. सातारा आणि कोल्हापुरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. तसेच पूर आणि भूस्खलनाचा धोका कमी होईल.
मराठवाड्यातील पावसाची स्थिती
मराठवाड्यात मध्यम ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
विदर्भ आणि खानदेशातील मान्सून परिस्थिती
विदर्भात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. नागपूरमध्ये 10 - 20 मिमी पाऊस अपेक्षित असून हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. खानदेशातील जळगाव आणि धुळे या जिल्ह्यात हलका पाऊस, काही ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हेही वाचा : वर्ध्यातील 67 वर्षाच्या आजोबाची भलतीच विकृती, कुत्र्यावर केले लैंगिक अत्याचार
याचपार्श्वभूमीवर हवामान विभागाने शेतकऱ्यांना पावसाची परिस्थिती पाहूनच पेरणीचा विचार करावा, असे सांगितले. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पिकांचे नुकसान टाळण्यासाठी पाण्याचा निचरा करावा. कोकणात पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. मुंबईत काही भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे.