'दीर आणि मेव्हण्यासोबत माझे संबंध...', महिलेच्या अनैतिक संबंधांची कहाणी ऐकून तुम्हीही चक्रावून जाल!

मुंबई तक

Crime News : उत्तर प्रदेशातील झांसीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. 24 जून रोजी सूनेनं आपल्या सासूची निर्घृणपणे हत्या केली आहे. पूजा जाटव (वय 29) असे सूनेचं नाव आहे. सूनेनं केलेल्या कारणाम्याने झांसी हादरून गेली आहे.

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सूनेनंच सासूची केली हत्या

point

कारण ऐकूण हादरून जाल

Crime News : उत्तर प्रदेशातील झांसीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. 24 जून रोजी सूनेनं आपल्या सासूची निर्घृणपणे हत्या केली आहे. पूजा जाटव (वय 29) असे सूनेचं नाव आहे. सूनेनं केलेल्या कारणाम्याने झांसी हादरून गेली आहे. पूजा जाटवने सुरूवातीला आपल्या पतीवर गोळीबार करत त्याचा खून केला. त्यानंतर ती आपल्या दीरासोबत झांसीमध्ये लिव्ह इनमध्ये राहू लागली होती.

हेही वाचा : मुंबई: निर्दयीपणाचा कळस.. 15 दिवसांचं बाळ सोडलं लोकलमध्ये टाकलं अन्.. ती महिला कोण?

दरम्यान, तिने आपल्या बहिणीच्या साथीने आपल्या सासूची हत्या केली. त्यानंतर तब्बल 8 लाख रुपयांचे दागिने पळवले. या प्रकरणात पोलिसांनी पूजा आणि तिच्या बहिणीला अटक केली. घटनेचा खुलासा होत नाही तोवर त्या अटकेतच असतील असे सांगितले. 

घटनेचा घटनाक्रम

घडलेल्या घटनेनुसार, टहरौली ठाण्यातील कुम्हरिया येथे पूजाने आपल्याच सासूचा खून केला. सुशील देवी (वय 54) असे तिचं नाव होतं. पोलिसांनी या खूनाचा तपास केल्यानंतर आरोपी पूजाचे नाव समोर आले आहे. या प्रकरणात पूजा आणि कमलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. या प्रकरणात अनिल नावाच्या तरुणाचा या प्रकरणात समावेश होता. 

फरार झालेला अनिल मंगळवारी रात्री चोरीचे दागिने घेऊन त्याच्या नातेवाईकांकडे गेला होता. तेव्हा पोलिसांनी अनिलवर गोळीबार केला. या गोळीबारात तो घायाळ झाला. त्याला उपचारासाठी एका मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले.

हे वाचलं का?

    follow whatsapp