'आपल्या डोक्यात हवा गेली होती, गर्विष्ट माणसाचे..', शोमधून काढल्यावर निलेश साबळेला एवढं कोणी सुनावलं?

मुंबई तक

‘चला हवा येऊ द्या’च्या दुसऱ्या पर्वातून निलेश साबळेला डच्चू देण्यात आला आहे. त्यानंतर राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी एक पोस्ट शेअर करून निलेश साबळेंच्या वागणुकीबाबत टीका केली आहे.

ADVERTISEMENT

शरद उपाध्येंनी निलेश साबळेला सुनावलं (फोटो सौजन्य: Facebook)
शरद उपाध्येंनी निलेश साबळेला सुनावलं (फोटो सौजन्य: Facebook)
google news

मुंबई: झी मराठीवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’च्या दुसऱ्या पर्वातून दिग्दर्शक आणि सूत्रसंचालक डॉ. निलेश साबळे याला डच्चू देण्यात आला आहे. त्याऐवजी अभिनेता अभिजीत खांडकेकर याला सूत्रसंचालनाची जबाबदारी देण्यात आली आहे. या निर्णयानंतर अनेक प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पण याच पार्श्वभूमीवर सुप्रसिद्ध राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी निलेश साबळे यांच्या डोक्यात हवा गेली होती.. असं विधान करत त्यांना आलेल्या अनुभवाबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

शरद उपाध्ये यांची पोस्ट जशीच्या तशी...

आदरणीय नीलेशजी साबळे,

आपल्याला हवा येऊ द्याच्या दुसऱ्या पर्वातून डच्चू देऊन त्या जागी अभिजीत खांडकेकरना आणल्याची बातमी आज पेपरमध्ये वाचली. वाईट वाटले पण आश्चर्य नाही. मला तुम्ही एकदा बोलवले होते. त्याप्रमाणे मी ११ वा. पोहोचलो. पण ३ वाजेपर्यंत त्या रुममध्ये कोणीच फिरकले नाही. मला पाणी हवे होते पण एकादोघांना सांगूनही ते आणतो म्हणून गेले ते आलेच नाहीत. 

मला रुम सोडू नका असे सांगीतले होते. नीलेश तुम्ही इतर कलावंतांच्या रुममध्ये जाऊन गप्पा मारीत होतात पण माझ्या रुममध्ये डोकावलात ते थेट ४ वा. स्माईलही न देता स्टेजवर गेलात. इतरांचे शूटिंग खूप वेळ केलेत पण मला ६ वा. बोलावून घाईघाईत १५ मिनिटात सारे आटोपले. 

हे वाचलं का?