मुंबई Tak चे वरिष्ठ व्हिडिओ जर्नालिस्ट वैभव कंगुटकरांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Vaibhav Kangutkar: इंडिया टुडे आणि मुंबई Tak चे वरिष्ठ व्हिडिओ जर्नालिस्ट वैभव कंगुटकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
ADVERTISEMENT
मुंबई: इंडिया टुडे आणि मुंबई Tak चे वरिष्ठ व्हिडिओ जर्नालिस्ट वैभव कंगुटकर यांचे आज (13 मे) सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने एक हरहुन्नरी आणि सर्जनशील असा व्हिडिओ जर्नालिस्ट गमावल्याची भावना संपूर्ण माध्यम क्षेत्रात व्यक्त केली जात आहे.
ADVERTISEMENT
निधनसमयी वैभव यांचं वय हे 48 वर्ष होतं. डिसेंबर 2003 साली वैभव हे आज तक वृत्तवाहिनीसाठी व्हिडिओ जर्नालिस्ट म्हणून इंडिया टुडे समुहात रुजू झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.
अतिशय मेहनती आणि धडपड्या वृत्तीचे व्हिडिओ जर्नालिस्ट अशी वैभव यांची माध्यम क्षेत्रात ओळख होती. इंडिया टुडे, आज तक आणि मुंबई Tak साठी शेकडो स्टोरी शूट करणाऱ्या वैभव यांनी आपलं कर्तव्य बजावतानाच अखेरचा श्वास घेतला.
हे वाचलं का?
देशात लोकसभा निवडणुकींचं मतदान सुरू असल्याने वैभव हे कार्यालयीन कामाकरिता मराठावाड्यात गेले होते. मागील काही दिवस ते याच भागात होते. आज सकाळच्या सुमारास त्यांनी मतदानासंदर्भातील काही स्टोरीही शूट केल्या. पण त्यानंतर अचानक त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि दुर्दैवाने त्यांचं निधन झालं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT