Sharad Pawar : "महाराष्ट्रातही मणिपूरसारखीच परिस्थिती होण्याची चिंता"
Sharad Pawar Manipur : आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना शरद पवार यांनी महाराष्ट्रात मणिपूरसारखी स्थिती निर्माण होण्याबद्दल शंका उपस्थित केली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
शरद पवारांनी महाराष्ट्रातील स्थितीबद्दल व्यक्त केली चिंता
आरक्षणाच्या मुद्द्यावरून पंतप्रधानांवर टीका
शरद पवार मणिपूर-महाराष्ट्राबद्दल नेमकं काय बोलले?
Sharad Pawar News : राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून सामाजिक सलोख्याला धक्का लागताना दिसत असून, काही भागांमध्ये जातीय संघर्ष होताना दिसत आहे. यावर चिंता व्यक्त करत शरद पवार यांनी मोठे विधान केले आहे. महाराष्ट्रातही मणिपूरसारखी स्थिती होते की काय, अशी चिंता वाटते, असे पवार म्हणाले. (Sharad Pawar expressed concern about social situation of Maharashtra)
ADVERTISEMENT
नवी मुंबईतील वाशीमध्ये सामाजिक ऐक्य परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी महाराष्ट्रातील सामाजिक स्थितीबद्दल भाष्य केले.
शरद पवार काय बोलले?
पवार म्हणाले की, "मणिपूरबद्दल देशाच्या संसदेत चर्चा झाली. मणिपूरचे विविध धर्माचे, भाषेचे लोक दिल्लीत आम्हाला भेटले. त्यांनी तेथील विदारक चित्र कथन केले. आता पिढ्यानुपिढ्या एकत्र असलेले लोक अस्वस्थ झाले आहेत. दोन जमातीत वाद झाला आहे. शेती उद्ध्वस्त झाली. स्त्रियांवर अत्याचार झाल्याचे चित्र त्यांनी आम्हाला सांगितले."
हे वाचलं का?
हेही वाचा >> केतकी चितळेचा यशश्रीच्या हत्येनंतर व्हिडीओ, पोलिसांवर गंभीर आरोप
"इतके मोठे संकट एका राज्यावर आल्यानंतर राज्यकर्त्यांची जबाबदारी वाढते. त्यांनी तेथील वातावरण शांत करण्यासाठी, सामाजिक ऐक्य जपण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पण, दुर्दैवाने आजच्या राज्यकर्त्यांनी त्याकडे ढुंकुनही पाहिले नाही", असे शरद पवार म्हणाले.
हेही वाचा >> यशश्रीच्या मृतदेहाचे कुत्रे तोडत होते लचके; पोलीस पोहोचले त्यावेळी काय दिसलं?
महाराष्ट्रातील स्थितीबद्दल पवार म्हणाले?
"तिकडे जावे. लोकांना दिलासा द्यावा, असे देशाच्या पंतप्रधानांना वाटले नाही. या गोष्टी मणिपूरसह आजूबाजूच्या राज्यातही घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी कर्नाटकमध्येही तसेच घडले आहे. आता अशा गोष्टी महाराष्ट्रात घडतात की काय, याची चिंता वाटते," असे विधान शरद पवार यांनी केले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT