Yashashree Shinde : केतकी चितळेचा यशश्रीच्या हत्येनंतर व्हिडीओ, पोलिसांवर गंभीर आरोप
Yashashree Shinde Ketaki chitale : उरण येथील यशश्री शिंदे हिच्या हत्येनंतर अभिनेत्री केतकी चितळेने संताप व्यक्त केला आहे. पोलीस आपल्या बाजूने नाहीत, असे दावा केतकी चितळेने केला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
यशश्री शिंदे हत्या प्रकरणावर केतळी चितळे काय म्हणाली?
अभिनेत्री केतकी चितळेने केले गंभीर आरोप
केतकी चितळेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Ketaki Chitale on Yashashree Shinde : 20 वर्षीय यशश्री शिंदे या तरुणीची हत्या करण्यात आली. या प्रकरणातील प्रमुख आरोपी दाऊद शेख हा फरार असून, त्याचा शोध पोलीस घेत आहे. दरम्यान, यशश्रीच्या हत्येनंतर अभिनेत्री केतकी चितळेने संताप व्यक्त केला आहे. पोलीस आणि प्रशासनावर आरोप करत केतकीने तिची भूमिका मांडली आहे. (Actress Ketaki Chitale has expressed her anger over Yashshree Shinde murder case)
ADVERTISEMENT
केतकी चितळे व्हिडीओमध्ये काय म्हणाली?
अभिनेत्री केतकी चितळेने व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने लव्ह जिहादचा मुद्दा अधोरेखित केला आहे. त्याचबरोबर पोलीस आपल्या बाजूने नाहीत, असा गंभीर आरोपही तिने केला आहे.
हेही वाचा >> बापानेच पुसलं लेकीचं कुंकू! रस्त्यातच जावयाची हत्या
केतकी म्हणते, "लव्ह जिहाद फक्त उत्तर प्रदेशात घडतो, हे खोटे आहे. लव्ह जिहाद फक्त केरळातच आहे, हे खोटे आहे. लव्ह जिहाद फक्त पश्चिम बंगालमध्ये आहे, हे खोटे आहे. मुस्लिमांचे वर्चस्व असलेल्या भागातच लव्ह जिहादच्या घटना घडता, हे खोटे आहे. लव्ह जिहाद फक्त ग्रामीण भागात आहे, हे खोटे आहे."
हे वाचलं का?
जस्टीस फॉर यशश्री शिंदे
"आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या वर्गातील महिलांसोबतच लव्ह जिहादच्या घटना घडतात, हे खोटे आहे. हिंदूच्या प्रत्येक स्तरामध्ये लव्ह जिहादच्या घटना घडत आहेत. हे खरं आहे. शहरे, गावे सगळीकडे. हॅशटॅग जस्टीस फॉर यशश्री शिंदे", असे केतकीने म्हटले आहे.
हेही वाचा >> ऑफिसला गेलेल्या यशश्रीचा मृतदेहच सापडला! चेहरा, गुप्तांगावर...
"आपल्या मुली गायब होताहेत. कधी फ्रीजमध्ये सापडतात, कधी कपाटात, तर कधी समुद्रात... नाहीतर सुटकेसमध्ये. पूर्वी लोकं स्वातंत्र्यासाठी लढले. आपल्याला आता धर्मासाठी लढायचे आहे."
ADVERTISEMENT
"पोलीस आपल्या बाजूने नाहीत. प्रशासन आपल्या बाजूने नाही. आपल्याला एकत्र येणे गरजेचे आहे. जय हिंद. वंदे मातरम. हर हर महादेव", असे केतकी चितळेने व्हिडीओमध्ये म्हटले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT