Yashashree Shinde : ऑफिसला गेलेल्या यशश्रीचा मृतदेहच सापडला! चेहरा, गुप्तांगावर...

मुंबई तक

ADVERTISEMENT

मयत यशश्री शिंदे
उरणमध्ये यशश्री शिंदे या तरुणीची हत्या करण्यात आली.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

उरणमध्ये यशश्री शिंदेची हत्या

point

आरोपी दाऊद शेख फरार

point

यशश्री शिंदेसोबत नेमके काय घडले?

Yashashree Shinde News : (निलेश पाटील, नवी मुंबई) 27 जुलै रोजी नवी मुंबईला लागून असलेल्या उरण गावात एका 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडला. हा मृतदेह होता दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या यशश्री शिंदे या तरुणीचा. पोलीस घटनास्थळी गेले, तेव्हा तरुणीच्या मृतदेहावर असंख्य जखमा होत्या. तरुणीचा चेहरा, शरीर आणि गुप्तांगावर धारदार शस्त्राने अनेक वार करण्यात आले होते. ऑफिसला जाण्यासाठी घरातून बाहेर पडलेल्या यशश्रीचा मृतदेहच सापडल्याने खळबळ माजली आहे. (20-year-old Yashashree shinde from uran killed, her body found in bushes near railway station)

ADVERTISEMENT

यशश्री शिंदे कुटुंबियासोबत उरण येथे राहायची. बेलापूरमधील एका कंपनीत कामाला होती. 25 जुलै 2024 रोजी यशश्री सकाळी कामावर जाण्यासाठी घरातून बाहेर पडली होती. 

घरातून बाहेर पडलेल्या यशश्री शिंदेचा मृतदेहच सापडला

मिळालेल्या माहितीनुसार यशश्री ऑफिसला गेली. घरातून बाहेर पडल्यापासूनच तिचा फोन बंद झाला होता. तिचा फोन लागत नसल्याने कुटुंबियांनी तिचा शोध सुरू केला.

हे वाचलं का?

हेही वाचा >> UPSC कोचिंग सेंटरमध्ये 3 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू, घटना घडली कशी? 

यशश्री घरी न आल्याने कुटुंबियांनी पोलीस ठाणे गाठले आणि बेपत्ता असल्याची तक्रार दिली. पोलिसांनी यशश्रीचा शोध सुरू केला. यशश्रीचा वेगळ्या ठिकाणी शोध घेत असलेल्या पोलिसांना 27 जुलै रोजी फोन आला. 

उरण रेल्वे स्थानकाजवळील झाडाझुडपामध्ये एक मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना कळाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाची पाहणी केली. त्यावेळी मृतदेहावर असंख्य जखमा होत्या. चेहरा, शरीर आणि गुप्तांगावर वार केलेले होते. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर तो मृतदेह यशश्रीचा असल्याचे समोर आले.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> पेट्रोल पंपाच्या रांगेत अचानक कोसळले, शिक्षकाला कसं गाठलं मृत्यूनं? 

पोलिसांनी यशश्री शिंदेच्या कुटुंबियांना मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी बोलवून घेतले. तो मृतदेह यशश्रीचाच असल्याचे नक्की झाल्यानंतर गुन्हा दाखल केला. यशश्रीच्या वडिलांनी दाऊद शेख या व्यक्तीवर आरोप केले आहेत.

ADVERTISEMENT

आरोपीचे यशश्रीला कॉल

समोर आलेल्या माहितीनुसार, ज्या दिवशी यशश्री बेपत्ता झाली. त्यानंतरचे तिचे कॉल रेकॉर्ड तपासण्यात आले. एका मोबाईल नंबरवर यशश्री बराच काळ बोलत होती. या नंबरवरून यशश्रीला कॉल येत होते आणि ती पण करत होती. हा नंबर दाऊद शेख याचा असल्याचे तपासातून समोर आले. दाऊद शेखने एकतर्फी प्रेमातून यशश्रीची हत्या केल्याचा संशय आहे.

काही वर्षांपूर्वी यशश्री आणि तिच्या कुटुंबियांनी दाऊद शेखविरोधात तक्रार दिली होती. त्याच्याविरोधात पॉक्सो कायद्यातंर्गत गुन्हा दाखल झालेला होता. आता पोलीस दाऊद शेखचा शोध घेत आहेत. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT