NCP: शरद पवार खवळले.. अखेर शस्त्र उपसलं, म्हणाले ‘माझ्या जिवंतपणी…’

साहिल जोशी

ADVERTISEMENT

After the split in NCP, President Sharad Pawar has issued a stern warning that no one should use his photo without permission.
After the split in NCP, President Sharad Pawar has issued a stern warning that no one should use his photo without permission.
social share
google news

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) उभी फूट पडल्याचं आता स्पष्ट झालं आहे. कारण 2 जुलै रोजी अजित पवार (Ajit Pawar) यांनी पक्ष भूमिकेच्या विपरीत भूमिका घेत भाजपसोबत (BJP) हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तसंच त्यांच्यासोबत 9 आमदारांनी शपथ घेतली. यासोबतच अजित पवार यांनी काल (3 जुलै) पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ या चिन्हावर दावा केला होता. ज्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे प्रचंड संतापले असल्याचं सूत्रांकडून समजतं आहे. ज्यानंतर आता शरद पवार यांनी अजित पवारांच्या गटाला खडे बोल सुनावले आहेत. एवढंच नव्हे तर एक असा निर्णय घेतला आहे की, ज्यामुळे अजित पवारांच्या गटाची बरीच अडचण होण्याची शक्यता आहे. (split in ncp president sharad pawar warning no one should use his photo only party with jayant patil as state president use photo ajit pawar bjp govt)

अजित पवार यांनी आपल्या पक्षाच्या विरोधात जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. असं शरद पवारांनी दोन दिवसांपूर्वीच जाहीर केलं होतं. असं असताना आता शरद पवारांनी थेट ठणकावलं आहे की, माझ्या परवानगीशिवाय कुणीही फोटो वापरू नये. पाहा स्वत:चा फोटो वापरण्याविषयी शरद पवार नेमकं काय म्हणाले:

शरद पवार संतापले, ‘ज्यांनी माझ्या विचारांशी द्रोह केला त्यांनी…’

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नावावर आणि निवडणूक चिन्हावर अजित पवारांनी दावा केल्यानंतर शरद पवार हे प्रचंड आक्रम झाले. ज्यानंतर त्यांनी आपला फोटो वापरायचा नाही असं अजितदादांच्या गटाला सुनावलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

याबात शरद पवार म्हणाले की, ‘माझा फोटो माझ्या परवानगीनेच वापरावा. ज्यांनी माझ्या विचारांशी द्रोह केला. ज्यांच्याशी माझा आता वैचारिक मतभेद आहे. जिवंतपणी माझा फोटो कुणी वापरावा हा माझा अधिकार. त्यामुळे मी ज्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. ज्याचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आहे. त्या पक्षाने माझा फोटो वापरावा. अन्य कुणीही माझा फोटो वापरू नये.’ असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

‘पक्ष आणि चिन्ह हे आमच्याबरोबर आहे’, अजित पवारांनी केलेला दावा

राष्ट्रवादीच्या शपथविधीनंतर काही संघटनात्मक निर्णय़ घेण्यासाठी उप मुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल पटेल, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांनी काल (3 जुलै) पत्रकार परिषद बोलावली होती. या पत्रकार परिषदेत शरद पवारांचा निर्णय लागू होतो की नाही, असा सवाल विचारण्यात आला होता. यावर प्रफुल पटेल म्हणाले होते की, नाही… यामागचे कारण म्हणजे, आमच्या निर्णयाला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बहुसंख्य लोकांनी पाठिंबा दिलेला आहे. लोकशाहीमध्ये बहुमताने घेतलेला निर्णय वैध आहे. कोणी त्याला बदलू शकते असे नाही, असे प्रफुल पटेल म्हणाले होते.

हे ही वाचा >> “अजित पवारांना मी सुद्धा हो म्हणालो होतो”, जितेंद्र आव्हाडांचं स्फोटक विधान

‘त्याचवेळी अजित पवार तात्काळ म्हणाले की, ‘आमच्याकडे आमदाराचं बहुमत आहेत म्हणूनच आज अजितदादा उपमुख्यमंत्री म्हणून तुमच्यासमोर बसला आहे. आम्ही पक्ष आहोत म्हणून आम्ही संख्या सांगत नाही. जे लोक पक्षावर अधिकार सांगत आहेत, त्यांनी सांगाव त्यांच्याकडे किती लोक आहेत. कारण पक्ष आम्हीच आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस नाव आणि चिन्ह हे आपल्याकडेच आहे’ असं अजित पवार म्हणालेले

ADVERTISEMENT

‘देश पातळीवर जे नरेंद्र मोदींचं नेतृत्व आहे त्या नेतृत्वाखाली देश जो आगेकूच करतोय त्यालाही पाठिंबा देत त्याचा फायदा विकासकामाला होतो. त्यामुळे काल जे काही पत्रकार परिषद घेऊन जे काही सांगण्याचा प्रयत्न केला आहे त्यात आम्हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख असल्यामुळे आणि आता प्रदेशाध्यक्ष या नात्याने कालपासून सुनील तटकरेंची नेमणूक केली असल्यामुळे आम्ही जे करतोय ते पक्षाच्या हिताचं करतोय. त्यामुळे 9 लोकांना नोटीस काढली वैगरे.. त्यांना काही नोटीस वैगरे काढण्याचा अधिकार नाही.’

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Exclusive: अजित पवारांसह 9 जणांची आमदारकी जाणार?, राहुल नार्वेकरांचं मोठं विधान…

‘शेवटी पक्ष आणि चिन्ह हे आमच्याबरोबर आहे असं आमचा ठाम विश्वास आहे. या सगळ्या गोष्टी करत असताना आमच्या बरोबरचे आमदार या सगळ्यांचं भवितव्य व्यवस्थित कशी राहील त्यांना कुठल्याही प्रकारची घटनेची कायद्याची अडचण येणार नाही याबाबतची खबरदारी आम्ही घेत आहोत.’असा दावा अजित पवारांनी केला होता.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT