Supriya Sule : ...अन् भरसभेत सुप्रिया सुळेंनी जोडले हात, कुणाला केली विनंती?

मुंबई तक

ADVERTISEMENT

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे.
सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअप हॅक झाल्यानंतरचा सगळा प्रकार सांगितला.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सुप्रिया सुळे यांनी सांगितलं व्हॉट्सअप कसं झालं हॅक?

point

जयंत पाटलांना सुप्रिया सुळेंच्या मोबाईलवरून मेसेज

point

सुप्रिया सुळेंनी पोलिसांकडे तक्रार केली

Supriya Sule Video : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे व्हॉट्सअप हॅक झाल्याचा प्रकार आज (११ ऑगस्ट) घडला. मोबाईल बंद असतानाही सुप्रिया सुळेंच्या व्हाट्सअपवरून काय मेसेज पाठवले गेले, याबद्दलही सुप्रिया सुळे यांनी सांगितले. (supriya sule mobile and whatsapp has been hacked)

शिवस्वराज्य यात्रेची दौंड तालुक्यातील पाटस येथे सभा झाली. या सभेत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "माझा फोन हॅक झाला आहे. हॅक झालाय म्हणजे माझा फोन माझ्या बरोबर दुसरं कुणीतरी चालवतंय. माझे व्हॉट्सअॅप उघडेना. मी जयंतरावांना फोन चेक करायला सांगितलं. तर जयंतरावांनी नमस्कार पाठवला. माझा फोन बंद आणि जयंतरावांना नमस्कार मेसेज आला."

जयंत पाटलांना काय आला मेसेज?

"मोबाईलमधील सीमकार्ड काढल्यावर जयंतरांवांनी मेसेज पाठवला की, 'आम्ही तुमची वाट बघतोय, सभा सुरू झाली आहे. तर त्या व्यक्तीने (मोबाईल हॅक करणाऱ्या) सांगितलं की तुम्ही कुठे आहात. माझा फोन बंद आहे, पण माझ्या मोबाईलवरून कोण व्यक्ती गप्पा मारतंय मला माहिती नाही", असे सुप्रिया सुळे यांनी सभेत बोलताना सांगितलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> '...तर ते मी खपवून घेणार नाही', ठाकरेंच्या ताफ्यावर हल्ला, राज ठाकरेंचा इशारा

"महाराष्ट्रात फोन हॅकची नवीन बळी मी झाली आहे. माझ्या फोनमध्ये लपवण्यासारखे काही नाही. फक्त माझ्या नवऱ्याला काही चुकीचे मेसेज पाठवू नका, एवढीच त्या हॅकरला विनंती आहे", असे म्हणत सुप्रिया सुळे सभेत हात जोडले. 

मी फोनच दिला असता; सुप्रिया सुळे काय बोलल्या?

सुप्रिया सुळे पुढे बोलल्या की, "फोन हॅक कसा झाला? कुणी केला? आता मी पोलीस अधीक्षकांशी बोलले आहे. यंत्रणा कुणाची असते माहिती नाही. जरूर त्यांनी ऐकावं. सगळी माहिती काढावी. विचारलं असतं, तर अशीच माहिती देऊन टाकली असती. फोनच दिला असता, घ्या काय करायचं ते करा."

ADVERTISEMENT

हेही वाचा >> ठाकरे ठाण्यात गेल्यानंतर मनसैनिकांनी काय काय केलं?

"मला ते सगळं घेऊन जायची सवय झाली आहे. पक्ष नेला. चिन्ह नेले. अजून काय काय नेतील, याची काही गॅरंटी नाही. सगळे घेऊन जाऊ शकतात माझ्याकडून फक्त मायबाप मतदार घेऊन जाऊ शकत नाही, हीच राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे", असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT