Raj Thackeray : '...तर ते मी खपवून घेणार नाही', ठाकरेंच्या ताफ्यावर हल्ला, राज ठाकरेंचा इशारा

मुंबई तक

Raj Thackeray Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर ठाण्यात शनिवारी (१० ऑगस्ट) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी बांगड्या आणि शेण फेकले. या घटनेवर राज ठाकरेंनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली. 

ADVERTISEMENT

राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला इशारा.
उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर झालेल्या बांगड्या आणि शेण फेकीवर राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावरील हल्ल्यानंतर पोस्ट

point

राज ठाकरे यांनी पोस्टमध्ये काय काय म्हटलंय?

point

मनसे कार्यकर्त्यांना राज ठाकरेंनी काय दिला 'मेसेज'

Raj Thackeray Social Media Post : उद्धव ठाकरे यांच्यावर ताफ्यावर ठाण्यात मनसे कार्यकर्त्यांनी बांगड्या आणि शेण फेकले. ताफ्यातील काही गाड्यांचे नुकसान झाले. ठाणे शहरामध्ये १० ऑगस्ट रोजी घडलेल्या या प्रकारावर आता राज ठाकरे यांनी मौन सोडलं आहे. राज ठाकरे यांनी या घटनेवर भाष्य करतानाच भविष्यात माझ्या आणि मनसैनिकांच्या नादाला लागू नका, असा इशाराही दिला आहे. (Raj Thackeray Warns Uddhav Thackeray's Shiv Sena) 

उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर शेण,बांगड्या फेकल्या, राज ठाकरे काय म्हणाले, वाचा जसेच्या तसे

सस्नेह जय महाराष्ट्र

काल ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या वाहन ताफ्यासमोर माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जी निदर्शनं केली, ती संतापातून आलेली प्रतिक्रिया होती. 

माझ्या नवनिर्माण यात्रेच्या दरम्यान जी काही विघ्न उभी करण्याचे प्रयत्न धाराशिवपासून सुरु झाले.  धाराशिवमध्ये निदर्शनाला आलेले, दाखवायला मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या नावाखाली घोषणा देत होते. पण पुढे लक्षात आले की त्यांचा या आंदोलनाशी काहीच संबंध नव्हता. 

ते तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटांशी संबंधित होते.  आणि या सगळ्या गोष्टी सोशल मीडियातून उघड्या पडल्या.

हे वाचलं का?

    follow whatsapp