राजीव गांधींच्या हत्येत काय होती पेरारिवलनची भूमिका?, आधी फाशी मग जन्मठेप आणि आता सुटका!

Rajeev Gandhi Murder Case: दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी पेरारिवलन याचा या हत्येच्या कटात काय रोल होता हे जाणून घ्या सविस्तर.
what was role of perarivalan in assassination of rajiv gandhi first hanging then life imprisonment and now release
what was role of perarivalan in assassination of rajiv gandhi first hanging then life imprisonment and now release

चेन्नई: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी (Rajeev Gandhi Murder) जन्मठेपेची (life sentence) शिक्षा भोगत असलेल्या एजी पेरारिवलनची (AG Perarivalan) सुटका करण्याचे आदेश देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने अखेर दिले आहेत.

राजीव गांधी यांच्या हत्येने संपूर्ण देश हादरला होता. या प्रकरणात पेरारिवलनसह 7 जणांना दोषी ठरवण्यात आले होते. त्यानंतर टाडा न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने पेरारीवलनला फाशीची शिक्षा सुनावली होती. या भीषण हत्याकांडाच्या कटात एजी पेरारिवलन याची महत्त्वाची भूमिका होती.

कोण आहे एजी पेरारिवलन?

एजी पेरारिवलन हा तामिळनाडूतील जोलारपेट शहरातील रहिवासी आहेत. त्याला 11 जून 1991 रोजी राजीव गांधी हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती. जेव्हा त्याला पकडण्यात आल तेव्हा त्याचं वय फक्त 19 वर्ष होतं. त्याने इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये डिप्लोमा केला होता. पुढील शिक्षणासाठी तो चेन्नईला आला. त्याचवेळी राजीव गांधी हत्येत सामील असलेल्या लोकांमध्ये त्यांचे नाव पुढे आले आणि त्याला अटक करण्यात आली.

त्याच्यावर दहशतवाद आणि विघटनकारी अॅक्टिव्हिटी (प्रतिबंध) कायदा म्हणजेच टाडा लावण्यात आला होता. तुरुंगात गेल्यानंतरही पेरारिवलनने आपला अभ्यास सुरू ठेवला होता. तुरुंगात असताना त्याने बारावीची परीक्षा दिली होती. ज्यामध्ये त्याला 91.33 टक्के गुण मिळाले होते.

त्यानंतर त्याने तामिळनाडू मुक्त विद्यापीठातून एक डिप्लोमा कोर्स पूर्ण केला होता. ज्यामध्ये त्याला सुवर्णपदक मिळालं होतं. त्याचे प्रशिक्षण इथेच थांबले नाही. नंतर त्याने इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून बीसीएचे शिक्षण पूर्ण केलं आणि नंतर कॉम्प्युटर्समध्ये पदव्युत्तर पदवी (Masters) घेतली. पेरारिवलन तुरुंगात त्याच्या तुरुंगातील साथीदारांसह एक बँड देखील चालवतो.

राजीव गांधी हत्येचा कट

1990 मध्ये राजीव गांधींच्या हत्येचा कट रचणाऱ्या प्रभाकरनला या प्रकरणात कोणतीही हयगय करायची नव्हती. म्हणून त्याने या मोहिमेची जबाबदारी शिवरासनकडे दिली होता, जो त्याचा अत्यंत विश्वासू होता. 1991 मध्ये, प्रभाकरनने योजना पूर्ण करण्यासाठी शिवरासनची चुलत बहीण धनू आणि शुभा यांना भारतात पाठवले. शिवरासन हा एप्रिल 1991 च्या सुरुवातीला धनू आणि शुभासोबत चेन्नईला आला होता.

तो धनू आणि शुभा यांना नलिनीच्या घरी घेऊन गेला होता. जिथे मुरुगन आधीच हजर होता. शिवरासन यांनी अतिशय हुशारीने बॉम्ब डिझायनर अरिवू याला इतरापासून दूर ठेवले होते. शिवरासन स्वत: पोरूर या ठिकाणी लपून राहिला होता. ते वेळोवेळी सर्वांना कारवाईच्या सूचना देत असत. त्यावेळी चेन्नईत तीन ठिकाणींहून राजीव गांधी हत्येचा कट पूर्ण करण्याचे काम सुरू होते. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे शिवरासन सोडले तर नेमकं टार्गेट कोण आहे हे अगदी शेवटपर्यंत कोणालाच माहीत नव्हते.

आपल्या टार्गेटचा अजिबात खुलासा न करता, शिवरासनने बॉम्ब तज्ज्ञ अरिवू याला एक असा बॉम्ब बनविण्यास सांगितला की, जो महिलेच्या कमरेभोवती बांधता येईल. शिवरासन याच्या सांगण्यानुसार अरिवूने एक बेल्ट तयार केला ज्यामध्ये सहा आरडीएक्सने भरलेले ग्रेनेड बसवले जाऊ शकत होते. त्याच्या प्रत्येक ग्रेनेडमध्ये 80 ग्रॅम C4 RDX भरलेले होते.

प्रत्येक ग्रेनेडमध्ये दोन मिलिमीटरचे दोन हजार आठशे स्प्लिंटर्स होते. सर्व ग्रेनेड चांदीच्या ताराच्या मदतीने समांतर जोडलेले होते. सर्किट पूर्ण करण्यासाठी बेल्टमध्ये दोन स्विच देण्यात आले होते. त्यातील एक स्विच बॉम्ब चार्ज करण्यासाठी आणि दुसरा स्फोट करण्यासाठी होता.

राजीव गांधी यांच्या हत्येत पेरारिवलनची भूमिका काय होती?

बॉम्ब तज्ज्ञ अरिवू याने महिलेच्या कमरेला बांधलेला बॉम्ब सुरू करण्यासाठी 9 एमएमची बॅटरी लावली होती. या कटाचा सूत्रधार शिवरासन याने एजी पेरारीवलन याच्याकडे बॅटरीची व्यवस्था करण्याचे काम सोपवले होते. शिवरासनच्या आदेशाची अंमलबजावणी करून एजी पेरारिवलन याने बाजारातून 9 मिमीची बॅटरी विकत घेतली आणि ती स्वतः शिवरासनला दिली.

याच बॅटरीचा वापर करून धनूने 21 मे 1991 रोजी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची तामिळनाडूतील श्रीपेरुंबदूर येथे निवडणूक रॅलीदरम्यान आत्मघातकी हल्ल्यात हत्या केली. सीबीआयच्या एसआयटीने दावा केला होता कीस एजी पेरारीवलन या प्रकरणाचा मास्टरमाइंड शिवरासनच्या सतत संपर्कात होता.

पेरारिवलनची अटक आणि सुटका

राजीव गांधी यांच्या हत्येनंतर देशभरातील सुरक्षा यंत्रणांचे धाबे दणाणले होते. संशयित आरोपींच्या अटकेची कारवाई सातत्याने सुरू होती. दरम्यान, सीबीआयच्या एसआयटीला मोठे यश मिळाले आणि 11 जून 1991 रोजी एजी पेरारीवलनला अटक करण्यात आली.

राजीव गांधी हत्येप्रकरणी बॉम्बस्फोटासाठी वापरल्या गेलेल्या दोन 9-व्होल्ट बॅटरी खरेदी केल्याचा आणि मास्टरमाइंड शिवरासनला पुरवल्याचा गुन्हा एजी पेरारीवलन यांच्याविरुद्ध न्यायालयात सिद्ध झाला.

what was role of perarivalan in assassination of rajiv gandhi first hanging then life imprisonment and now release
युसुफ लकडवालाचे शरद पवार- राजीव गांधींशीही संबंध, फोटो दाखवत मोहित कंबोज यांचा आरोप

या प्रकरणात पेरारिवलनसह 7 जण दोषी आढळले, ज्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र नंतर काही दोषींची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलण्यात आली. ज्यामध्ये पेरारिवलनचाही सहभाग होता. पेरारिवलन याच्यावरुन अनेकवेळा तामिळनाडूमध्ये राजकीय उलथापालथ देखील झाली आहे. आता तब्बल तीन दशकांहून अधिक काळ तुरुंगात काढल्यानंतर तो तुरुंगातून बाहेर आला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in