Mumbai Tak /बातम्या / Ind vs Aus 2nd ODI: आजच्या भारत-ऑस्ट्रेलिया मॅचवर मोठं सकंट, जाणून घ्या ताजे अपडेट्स
बातम्या स्पोर्ट्स

Ind vs Aus 2nd ODI: आजच्या भारत-ऑस्ट्रेलिया मॅचवर मोठं सकंट, जाणून घ्या ताजे अपडेट्स

Ind vs Aus Live Match: भारत (India) वि. ऑस्ट्रेलिया (Australia)यांच्यात आज (19 मार्च) विशाखापट्टणम (Visakhapatnam) येथे दुसरा वननडे खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने पहिला सामना पाच गडी राखून जिंकला होता. आता हा सामना जिंकून मालिकेवर कब्जा करण्याची त्याच्याकडे सुवर्णसंधी आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता हा सामना खेळवला जाईल. (clouds of crisis on india australia second odi know the latest weather update of visakhapatnam)

विशाखापट्टणम दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान चाहते विशाखापट्टणममधील हवामानावरही लक्ष ठेवून आहेत. सामन्यादरम्यान पावसाची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. सामना सुरू असताना चांगला सूर्यप्रकाश असेल पण त्यात बदलही होऊ शकतो. सायंकाळी 3 ते 5 दरम्यान पावसाची सध्या शक्यता वर्तवली जात आहे. सामन्यादरम्यान आर्द्रता 81 टक्के आणि दवबिंदू (Dew Point) 21 अंश सेल्सिअस असण्याचा अंदाज आहे.

Accuweather नुसार हवेची गुणवत्ता चांगली असेल. एकूणच, सामन्यादरम्यान 76 टक्के ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. विशाखापट्टणममध्येही आज सकाळी जोरदार पाऊस झाला. पण या क्षणाचे ताजे अपडेट म्हणजे पाऊस तूर्तास तरी थांबला आहे आणि आकाशही निरभ्र झाले आहे. खेळ वेळेवर सुरू होईल अशी आशा आहे.

Ind Vs Aus, 2nd ODi: रोहित शर्मा संघात परतल्यास ‘या’ खेळाडूला जावं लागणार बाहेर

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सर्वांच्या नजरा टीम इंडियाच्या प्लेइंग-11 वर असतील. कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी संघात सामील झाल्यामुळे भारतीय संघाच्या प्लेइंग-11 मध्ये बदल होणे निश्चितच आहे. रोहित पहिल्या सामन्यात कौटुंबिक कारणांमुळे खेळू शकला नाही आणि त्याच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्याने संघाची धुरा सांभाळली. रोहित प्लेइंग-11 मध्ये इशान किशन किंवा सूर्यकुमार यादवची जागा घेऊ शकतो.

वर्ल्ड कपनंतर रोहित शर्मा नसणार कर्णधार; सुनील गावस्करांचं मोठं विधान

विशाखापट्टणममधील हवामानाचा अंदाज

कमाल तापमान: 26°C

किमान तापमान: 23 अंश सेल्सिअस

पावसाची शक्यता: 80%

ढगाळ वातावरण: 76%

वाऱ्याचा वेग: 32 किमी/प्रतितास

रोहित शर्मा पहिल्या वनडे सामन्यात न खेळल्याने कोण झालं नाराज?

रोहित शर्मा पहिल्या सामन्यात न खेळल्याने माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर नाराज झाला आहे. रोहित आता विश्वचषकापर्यंत सर्व एकदिवसीय सामने खेळेल, अशी आशा त्याने व्यक्त केली आहे. आगरकर म्हणाला की, ‘पहिल्या वनडेत भारताला कर्णधार रोहितची गरज भासली होती. ‘आशा आहे की तो आतापासून प्रत्येक वनडेत खेळेल. वैयक्तिक कारणांमुळे तो पहिला सामना खेळू शकला नाही. तुमच्याकडे प्लॅन बनविण्यासाठी आता अनेक वनडे सामने नाहीत. त्यामुळे त्याने कोणताही सामना गमावू नये अशी माझी इच्छा आहे. जोपर्यंत त्याच्या फलंदाजीचा प्रश्न आहे, मला वाटत नाही की यात काही अडचण आहे.’ असं आगरकर यावेळी म्हणाला.

KL Rahulला उपकर्णधारपदावरून काढल्यानंतर रोहित शर्मा पहिल्यांदाच बोलला

---------
PM मोदींची नवीन संसद भवनाला सरप्राईज व्हिजीट; प्रत्येक कामाचा घेतला आढावा कोहलीने शेअर केली आपली 10 वीची मार्कशीट, मिळालेले किती टक्के? ‘मेरा दिल तेरा दिवाना…’, तरुणी अचानक रेल्वे स्टेशनवर का नाचली? Bollywood: वय 50च्या पुढे पण आजही दिसतात पंचवीशीतल्या, पाहा कोण आहेत ‘या’ अभिनेत्री IPL 2023 : 12 क्रिकेटपटू खेळू शकणार नाही सुरूवातीचे सामने, पहा कोण आहेत ते? मुकेश अंबानींचा दुबईतील बंगला पाहिला का?, किंमत ऐकून व्हाल हैराण! IPL : एमएस धोनी याबाबतीत सर्वात पुढे, रोहित-विराट खूपच मागे ‘मला बाथरूममध्ये नेत…’, शिव ठाकरेने सांगितला कास्टिंग काऊचचा भयंकर अनुभव पोलीसाने भर रस्त्यात गर्लफ्रेंडला केलं प्रपोज, पुढे काय घडलं? Video व्हायरल Akanksha Dubey: अभिनेत्री आकांक्षाचा मृत्यू कसा झाला? पोस्टमॉर्टेम रिर्पोटमध्ये कळलं कारण अनुष्का शर्माचे टॅक्स प्रकरण काय? विक्रीकर विभागाचे म्हणणे काय? रस्त्यावर दगडं, गाड्यांची राखरांगोळी, छत्रपती संभाजीनगरातील ही दृश्ये बघितली का? WPL लाइव्ह मॅचमध्ये टीम इंडियाच्या ‘या’ स्टार खेळाडूंनी धरला ठेका, Video व्हायरल! Facebook-Instagram वर ब्लू टिक हवीये? भारतीयांसाठी असे आहेत प्लान Ayodhya: अयोध्येतील यंदाची रामनवमी आहे विशेष, भाविकांचा लोटला जनसागर सुहाना खान अमिताभच्या नातवाला करतेय डेट? Samantha Ruth Prabhu: कुटुंबीयांनी विरोध केला, पण मी…, सामंथाने सोडलं मौन रस्त्यावर विकले जाणारे ‘हे’ पदार्थ मुकेश अंबानींच्या फार आवडीचे! 15व्या वर्षी राहिलेली गरोदर… मुलीने सांगितली इमोशनल स्टोरी! 2 मुलांची आई, वय 40 पेक्षा जास्त; तरीही ‘या’ अभिनेत्री…