Mumbai Tak /बातम्या / Ind Vs Aus : तिसऱ्या कसोटीत भारतीय संघ संकटात; 50 धावात निम्मा संघ तंबूत
बातम्या स्पोर्ट्स

Ind Vs Aus : तिसऱ्या कसोटीत भारतीय संघ संकटात; 50 धावात निम्मा संघ तंबूत

Border Gavaskar Series : भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind Vs Australia) यांच्यात इंदूरमध्ये (Indore) खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या तासात असं काही घडलं की ज्याची कोणालाच अपेक्षा नव्हती. (Cricket Pitch ) खेळपट्टीबाबत सतत चर्चा होत होती, पण इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियन (Australian Spinner) फिरकीसमोर सर्व काही अपयशी ठरले. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय चुकीचा ठरला. Indian team in trouble, 7 wicket loss in 81 runs

मॅचच्या पहिल्याच बॉलवर रोहित शर्मा आऊट होता, मग नेमकं काय झालं?

कसोटी सामन्याच्या पहिल्या तासात टीम इंडियाचा निम्मा संघ बाद झाला. कर्णधार रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, रवींद्र जडेजा आणि श्रेयस अय्यर, विराट कोहली, श्रीकर भारत यांची जणू शर्यतच लागली होती. टीम इंडियाने येथे 45 धावांवर आपले पाच विकेट गमावले होते. कांगारू संघाच्या फिरकीने येथील प्रत्येकाला घेरले होते. 81 धावांवर भारताचे 7 गडी बाद झाले.

भारतीय विकेट

• 1-27 रोहित शर्मा, 5.6 षटके

• 2-34 शुभमन गिल, 7.2 षटके

• 3-36 चेतेश्वर पुजारा, 8.2 षटके

• 4-44 रवींद्र जडेजा, 10.5 षटके

• 5-45 श्रेयस अय्यर, 11.2 षटके

• 6-70 विराट कोहली, 21.4 षटके

• 7- 81 श्रीकर भारत, 24.5 षटके

ऑस्ट्रेलियासाठी त्यांच्या फिरकीपटूंनी येथे शानदार कामगिरी केलीय. इंदूरची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करू शकते, असे पूर्वी सांगितले जात होते, परंतु पहिल्या पाच षटकांतच चेंडू वळू लागला. यामध्ये ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू कुनहनमनने 3, तर नॅथन लायनने 3 तर टॉड मर्फीने 1 विकेट्स घेतल्या. भारताचा कर्णधार रोहित शर्मा सलामीला उतरला होता. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर तो बाद होता. पहिलाच बॉल बॅटची कड घेऊन किपरने टिपला, अपील झाली, मात्र अम्पायरने नॉटआऊट दिलं. ऑस्ट्रेलियाने पण डीआरएस न घ्यायची चूक केली. मात्र रोहित शर्मा जीवदानचा फारसा फायदा घेऊ शकला नाही. नंतर 12 धावा करून तो बाद झाला.

भारतीय महिला क्रिकेट संघासाठी गुडन्यूज; थेट T20 वर्ल्ड कपमध्ये एंट्री

कोणी किती धावा केल्या?

रोहित शर्मा – 12 धावा, 23 चेंडू

शुभमन गिल – 21 धावा, 18 चेंडू

चेतेश्वर पुजारा – 1 धाव, 4 चेंडू

रवींद्र जडेजा – 4 धावा, 9 चेंडू

श्रेयस अय्यर – 0 धावा, 2 चेंडू

विराट कोहली – 22 धावा, 52 चेंडू

श्रीकर भारत – 17 धावा, 30 चेंडू

भारताचे प्लेइंग-11: शुभमन गिल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, एस. भरत, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, उमेश यादव, मोहम्मद सिराज

ऑस्ट्रेलियाचे प्लेइंग-11: ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, अॅलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, टी. मर्फी, नॅथन लियॉन, एम. कुनहानेमन

बाबाची एकच चर्चा!गरम तव्यावर बसून भक्तांना आशिर्वाद Palak Tiwari: पलक तिवारीच्या बोल्ड लुकची एकच चर्चा प्रसिद्ध अभिनेत्री आकांक्षा दुबेची आत्महत्या इजिप्तमधल्या गर्लफ्रेंडसोबत सीक्रेट वेडिंग, आता अभिनेता बनला पिता…. IPL five new rules : आता आणखी मजा येणार, पाच नवे नियम आयपीएलचा गेम बदलणार mumbai local mega block today : मुंबईकरांनो, सुट्टीचा प्लान आहे, मग लोकलचे वेळापत्रक जाणून घ्या प्रियकराला विष दिलं नंतर फोनवर म्हणाली, ‘मेला नाहीस तर गळफास घे’ Health Tips: ‘या’ आजारांमध्ये लसूण खाणं ठरू शकतं खतरनाक Janhvi Kapoor: जान्हवीची ग्लॅमरस बोल्ड अदा, पण झाली ट्रोल; यूजर्स म्हणाले प्लॅास्टिक… बागेश्वर बाबासोबत ‘ही’ तरूणी अडकणार लग्नबंधनात? जेव्हा चालू लेक्चरमध्ये विद्यार्थ्याने चक्क बनवला मसाला डोसा, प्राध्यापकही झाले हैराण Kapil Sharma च्या ऑनस्क्रीन गर्लफ्रेंडचा हॉट आणि बोल्ड लूक IPL ची पहिली मॅच केव्हा झालेली? सर्वात जास्त धावा करणारा खेळाडू कोण? रक्षकच बनले भक्षक! पोलिसांचाच गॅगरेप पिडितेवर बलात्कार Uttar Pradesh: महिलेच्या हत्येचे गूढ 9 वर्षांनंतर एका पोपटाने उलगडलं… Shraddha Arya: बॉलिवूड अभिनेत्रीने पतीच्या वाढदिवसाला घातली बिकिनी, नेटकरी म्हणाले… प्रसुतीनंतर अभिनेत्रीचं अविश्वसनीय ट्रान्सफॉर्मेशन, घटवलं 10 किलो वजन! Amrita Ahuja: हिंडेनबर्गच्या अहवालात भारतीय वंशीय महिलेचं नाव, गंभीर आरोप 38 कोटींचा बेवारस चेक परत केला अन् जे मिळालं त्याने पायाखालची जमीन सरकली Twitter Blue tick: ब्लू टिकसाठी आता पैसे भरा, महिन्याला किती रुपये द्यावे लागणार?