WPL 2023 Auction: महिला क्रिकेटचा नवीन अध्याय; WPL साठी आज लिलाव

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Women primer league: 13 फेब्रुवारी (सोमवार) हा भारतीय महिला क्रिकेटसाठी (indian women cricket) ऐतिहासिक दिवस (Historical Day) असणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) प्रथमच महिला प्रीमियर लीग (WPL) चे आयोजन केले आहे. यासाठी आज मेगा लिलाव (mega auction) आयोजित करण्यात आला असून, त्यामध्ये महिला क्रिकेटपटूसाठी बोली लावणार आहेत. लिलावात एकूण 409 खेळाडूंची यादी आहे, त्यापैकी फक्त 90 खेळाडूंनाच खरेदी करता येणार आहे. Women primer League auction Today

ADVERTISEMENT

WIPL : महिला आयपीएलमुळे बीसीसीआय झाली कोट्यधीश, अशी झाली कमाई

महिला क्रिकेटचा नवा अध्याय

महिला क्रिकेटने गेल्या काही वर्षांत केवळ भारतातच नव्हे तर जगभरात खूप प्रगती केली आहे. अनेक लीग सातत्याने होत आहेत, महिला क्रिकेट संघांचे सामने टीव्ही आणि सोशल मीडियावर पाहिले जात आहेत आणि त्याबद्दल चर्चाही होत आहे. फॅन फॉलोइंगच्या बाबतीत भारतातील अनेक महिला क्रिकेटपटू मोठ्या स्टार्सला मागे टाकत आहेत. महिला प्रीमियर लीग महिला क्रिकेटमध्ये एक नवीन अध्याय जोडत आहे.

हे वाचलं का?

बीसीसीआय हे क्रिकेटमधील सर्वात मोठे नाव आहे आणि येथे सर्वात जास्त पैसाही आहे, म्हणूनच ते गेम चेंजर मानले जात आहे. पहिल्या सत्रापूर्वीच टीव्हीचे हक्क, संघांची विक्री आणि खेळाडूंचा लिलाव यामध्ये हजारो कोटी रुपये खर्च केले जात आहेत.

लिलावाशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी…

• महिला प्रीमियर लीगमध्ये एकूण ५ संघ सहभागी होत आहेत. यामध्ये मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, गुजरात जायंट्स, दिल्ली कॅपिटल्स आणि यूपी वॉरियर्स या संघांचा समावेश आहे. प्रत्येक संघाकडे 12-12 कोटी रुपयांची पर्स असेल.

ADVERTISEMENT

• WPL लिलावाच्या यादीत एकूण 409 खेळाडू आहेत, ज्यात 202 कॅप्ड खेळाडू, 199 अनकॅप्ड खेळाडूंचा समावेश आहे. यामध्ये 246 भारतीय, 163 विदेशी खेळाडू आहेत. ऑस्ट्रेलिया (28) आणि इंग्लंडचे (27) खेळाडू सर्वाधिक आहेत.

ADVERTISEMENT

• प्रत्येक संघ त्यांच्या संघात 15 ते 18 खेळाडूंचा समावेश करू शकतो. 24 खेळाडू आहेत ज्यांची मूळ किंमत 50 लाख आहे, 30 खेळाडूंची 40 लाख तर काहींची 30 लाख आहे. अनकॅप्ड खेळाडूंची मूळ किंमत 10 ते 20 लाख आहे.

Women’s IPL मध्ये Adani vs Ambani असा सामना पाहायला मिळणार, कसं?

• भारतीय खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर, स्मृती मानधना, शेफाली वर्मा, हरमनप्रीत कौर, जेमिमा रॉड्रिग्स आणि दीप्ती शर्मा यांसारखी मोठी नावे लिलावात लक्ष केंद्रित करणार आहेत.

• जर आपण परदेशी खेळाडूंबद्दल बोललो तर, सर्वांच्या नजरा ऑस्ट्रेलियाच्या अॅलिसा पेरी, ऑस्ट्रेलियाच्या मेग लॅनिंग, न्यूझीलंडच्या सोफी डेव्हाईन, इंग्लंडच्या सोफी एलिस्टन यांसारख्या खेळाडूंवर आहेत.

महिला प्रीमियर लीगचा लिलाव 13 फेब्रुवारी रोजी दुपारी 2.30 वाजता होणार आहे. हे मुंबईत आयोजित केले जात आहे, ते स्पोर्ट्स 18 आणि जिओ सिनेमा अॅपवर प्रसारित केले जाईल. महिला प्रीमियर लीग लिलावाशी संबंधित सर्व अपडेट्स तुम्ही mumbaitak.in वर जाणून घेऊ शकता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT