Harry brook नावाचं वादळ; विनोद कांबळीचाही तोडला रेकॉर्ड
Harry brook England vs New Zealand : कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय भूमीवर (Australian team) ऑस्ट्रेलियन संघाची अवस्था बिकट झाली आहे. 4 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन कसोटीत ऑस्ट्रेलियन टीम पराभूत झाली आहे. आता शेवटचे दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. या मालिकेनंतर ऑस्ट्रेलियन संघाला जूनमध्ये (England tour for ashes series) इंग्लंड दौऱ्यावर 5 कसोटी सामन्यांची अॅशेस मालिका खेळायची […]
ADVERTISEMENT
Harry brook England vs New Zealand : कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय भूमीवर (Australian team) ऑस्ट्रेलियन संघाची अवस्था बिकट झाली आहे. 4 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन कसोटीत ऑस्ट्रेलियन टीम पराभूत झाली आहे. आता शेवटचे दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. या मालिकेनंतर ऑस्ट्रेलियन संघाला जूनमध्ये (England tour for ashes series) इंग्लंड दौऱ्यावर 5 कसोटी सामन्यांची अॅशेस मालिका खेळायची आहे. पण त्याआधी कांगारू संघाला कसोटी क्रिकेटमध्ये कहर करणाऱ्या इंग्लिश खेळाडूविरुद्ध विशेष रणनीती आखावी लागणार आहे. England Batsman Harry Brook Break record
ADVERTISEMENT
Harry Brook : तब्बल 13.25 कोटीत खरेदी… महागडा ठरलेला हा खेळाडू कोण?
हॅरी ब्रूक असे या खेळाडूचे नाव आहे. इंग्लंडच्या या खेळाडूने न्यूझीलंडविरुद्धच्या वेलिंग्टन कसोटीत 184 धावांची खेळी केली आहे. त्याच्या कारकिर्दीतील ही सर्वोत्तम खेळी होती. यासह ब्रूकने ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला आहे. कसोटी कारकिर्दीतील पहिल्या 9 डावात सर्वाधिक 807 धावा करणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. हॅरीची सरासरी 100.88 आहे.
हे वाचलं का?
पदार्पणानंतर पहिल्या 9 डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम
807* धावा – हॅरी ब्रूक (इंग्लंड)
798 धावा – विनोद कांबळी (भारत)
ADVERTISEMENT
780 धावा – हर्बर्ट सटक्लिफ (इंग्लंड)
ADVERTISEMENT
778 धावा – सुनील गावस्कर (भारत)
777 धावा – एव्हर्टन वीक्स (वेस्टइंडीज)
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीच्या पहिल्या दिवशी पावसाने प्रभावित झालेल्या इंग्लंडने तीन गडी बाद 315 धावा केल्या. हॅरी ब्रूक (184 धावा) आणि जो रूट (101 धावा) यांची शतके आणि चौथ्या विकेटसाठी नाबाद 294 धावांची भागीदारी यामुळे हे शक्य झाले. इंग्लंडचे सुरुवातीला तीन झटपट विकेट गेले आणि दिवसाचा खेळ फक्त 65 षटकांनंतर संपवावा लागला. मात्र या सगळ्यानंतरही इंग्लंडने सामन्यात आणि मालिकेत आपला ताबा मिळवला आहे.
कॅच पकडल्यावर शेफालीने AUS खेळाडूला दिली शिवी?
ब्रूकने कसोटीत आतापर्यंतची त्याची सर्वोत्तम धावसंख्या केली आहे, त्याआधी त्याची सर्वोत्तम कसोटी धावसंख्या ही डिसेंबरमध्ये पाकिस्तानविरुद्ध 153 धावांची खेळी होती. आणि गेल्या पाच कसोटीतील त्याचे हे चौथे शतक आहे. त्याच्या नावावर तीन अर्धशतके देखील आहेत आणि त्याने केवळ नऊ कसोटी डावांमध्ये 807 धावा केल्या आहेत, जे त्याच्या कसोटी क्रिकेटमधील कारकिर्दीच्या या टप्प्यावर इतर कोणत्याही खेळाडूपेक्षा सर्वोत्तम आहे.
ब्रुकने कठीण परिस्थितीत डाव सांभाळला इंग्लंडने सात षटकांत 21 धावांत तीन विकेट गमावल्या होत्या, त्यानंतर ब्रुक क्रीजवर आला आणि त्याने सकारात्मक फलंदाजी करत गोलंदाजांवर दबाव आणला. रुटनेही त्याच्यासोबत आपले 19 वे कसोटी शतक पूर्ण केले. नंतर पावसाला सुरुवात झाली. अशाप्रकारे ब्रुक आणि रुट यांच्यातील भागीदारीही इंग्लंडची न्यूझीलंडविरुद्ध चौथ्या विकेटसाठीची सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT