बारामतीचा अभिषेक ननवरे ठरला देशातला पहिला युवा आयर्नमॅन..
वसंत मोरे, प्रतिनिधी, बारामती दक्षिण आफ्रिकेत पार पडलेल्या आयर्नमॅन स्पर्धेत बारामतीतल्या अभिषेक सतीश ननवरे या युवकाने देशातला सर्वात युवा आयर्नमॅन हा किताब मिळवला आहे. त्याने आयर्नमॅन स्पर्धेतील टास्क निर्धारित वेळेपेक्षा कमी कालावधीत पूर्ण करत नव्या विक्रमाची नोंद केली आहे. ग्रामीण भारतातील सर्वाधिक कमी वयाचा आयर्नमॅन होण्याचा विक्रम अभिषेकने वयाच्या 18 व्या वर्षी केला आहे. आयर्नमॅन […]
ADVERTISEMENT

वसंत मोरे, प्रतिनिधी, बारामती
दक्षिण आफ्रिकेत पार पडलेल्या आयर्नमॅन स्पर्धेत बारामतीतल्या अभिषेक सतीश ननवरे या युवकाने देशातला सर्वात युवा आयर्नमॅन हा किताब मिळवला आहे. त्याने आयर्नमॅन स्पर्धेतील टास्क निर्धारित वेळेपेक्षा कमी कालावधीत पूर्ण करत नव्या विक्रमाची नोंद केली आहे. ग्रामीण भारतातील सर्वाधिक कमी वयाचा आयर्नमॅन होण्याचा विक्रम अभिषेकने वयाच्या 18 व्या वर्षी केला आहे.
आयर्नमॅन ही स्पर्धा जागतिक पातळीवर घेतली जाते. विविध देशातील स्पर्धक यामध्ये सहभागी होत असतात. अभिषेकने निर्धारित केलेल्या 17 तासांच्या वेळेपेक्षा 13 तास 33 मिनिटांपेक्षा कमी वेळेत ही स्पर्धा पूर्ण करत ‘आयर्नमॅन’ हा जगविख्यात मानला जाणारा मानाचा किताब मिळविला आहे. अभिषेक याने यासाठी मागील दीड वर्षांपासून तयारी सुरू केली होती. सायकलिंग आणि पोहण्याच्या सरावाबरोबरच योग्य पद्धतीचा डाएट देखील त्याला पाळवा लागला होता.










