मला प्रशिक्षकपद मिळू नये म्हणून 2017 मध्ये प्रयत्न केले गेले; रवी शास्त्रींचा गौप्यस्फोट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

टी-२० विश्वचषकात भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांना मुदतवाढ न देण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला. त्यांच्या जागेवर राहुल द्रविडला मुख्य प्रशिक्षकपदाची संधी देण्यात आली. रवी शास्त्रींनी एका मुलाखतीमध्ये बोलत असताना २०१७ साली आपल्याला प्रशिक्षकपद मिळू नये यासाठी प्रयत्न केले गेले असा गौप्यस्फोट केला आहे.

ADVERTISEMENT

२०१४ सालापासून रवी शास्त्री टीम इंडियात संचालक म्हणून काम पाहत होते. २०१६ साली रवी शास्त्री प्रशिक्षकपदासाठीच्या मुलाखतींमध्ये सहभागी झाले होते. परंतू त्यावेळी अनिल कुंबळेकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. २०१७ साली चॅम्पिअन्स ट्रॉफीत झालेल्या पराभवानंतर अनिल कुंबळेने राजीनामा दिल्यानंतर रवी शास्त्री प्रशिक्षक म्हणून संघात परतले.

“माझ्या दुसऱ्या संधीदरम्यान खूप मोठा वाद झाला होता. ज्या लोकांना मी टीम इंडियामध्ये यायला नको हवं होतं त्यांच्यासाठी तर ती एक चपराक होती. त्यांनी दुसऱ्या व्यक्तीची निवड केली आणि ९ महिन्यांनी पुन्हा एकदा त्याच माणसाला निवडलं ज्याला त्यांनी आधी बाहेर केलं होतं. मी कोणाकडे बोटं दाखवत नाहीये, पण मला प्रशिक्षकपद मिळू नये यासाठी प्रयत्न केले गेले, पण आयुष्य हे असचं असतं. मला ती संधी अखेर मिळालीच”, रवी शास्त्री टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

हे वाचलं का?

रोहित नेहमी संघाच्या हिताचा विचार करतो, Virat ला कॅप्टन्सीवरुन हटवण्याचा निर्णय योग्यच – रवी शास्त्री

याच मुलाखतीत रवी शास्त्रींनी २०१९ विश्वचषकाच्या संघनिवडीवर आपला आक्षेप बोलून दाखवला. विश्वचषकासाठीच्या संघात तीन यष्टीरक्षक निवडण्याच्या विरोधात मी होतो. अंबाती रायुडूला संघाबाहेर करण्यात माझा जराही हात नाही. संघ निवडीत माझं मत महत्वाचं नव्हतं, परंतू तीन यष्टीरक्षक निवडीला माझा विरोध होता. अंबाती किंवा श्रेयस अय्यरला संधी मिळायला हवी होती. धोनी, पंत आणि दिनेश कार्तिक एकाच संघाच असण्यामागे काय लॉजिक आहे? पण मी निवड समितीच्या कामकाजात कधीच हस्तक्षेप केला नसल्याचं रवी शास्त्रींनी सांगितलं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT