IPL 2022 भारतातच होणार, पण… पाहा BCCI च्या सूत्रांनी काय दिली माहिती

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

IPL 2022 Update: इंडियन प्रीमियर लीग 2022 चा सीजन आता जवळ येत आहे. यावेळी आयपीएल भारतातच होणार आहे. मात्र कोरोनाच्या वाढती रुग्णसंख्या लक्षात घेतात बीसीसीआय संपूर्ण परिस्थितीबाबत वेगळ्या पद्धतीने विचार करत आहे. शनिवारी बीसीसीआय आणि आयपीएलच्या संघांमध्ये नवीन हंगामाबाबत चर्चा झाली.

ADVERTISEMENT

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयला आशा आहे की आयपीएलचे आयोजन भारतातच केले जाईल. यासाठी खेळाडूंना जास्त प्रवास करावा लागणार नाही. यासाठी मुंबई आणि नजीकच्या शहरांकडे पर्याय म्हणून पाहिले जात आहे. याशिवाय आयपीएल सुरू होण्याची तारीख 27 मार्च असू शकते. तसेच यावेळी प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील.

कारण अजूनही कोरोनाचं संकट संपलेलं नाही. अशा परिस्थितीत खेळाडूंना बायो-बबलमध्येच राहावे लागेल. त्यामुळे बीसीसीआयचा प्रयत्न आहे की, जर आयपीएल भारतात आयोजित केले गेले तर अशी जागा असावी जिथे स्टेडियम अधिक असतील. म्हणजे विविध सामने हे तिथेच आयोजित करता येतील.

हे वाचलं का?

मात्र, कोरोनाचा विचार करून बॅकअप प्लॅनचीही तयारी सुरू करण्यात आली आहे. जर आयपीएल स्पर्धा भारताबाहेर खेळवावी लागली तर दक्षिण आफ्रिका किंवा यूएई हाच पर्याय असू शकतो. संघांची त्यालाच पसंती आहे.

कोरोनामुळे IPL 2021 चा अर्धा मोसम देखील UAE मध्ये आयोजित करण्यात आला होता. अशा परिस्थितीत यंदा आयपीएल भारतातच होईल, अशी चाहत्यांना अपेक्षा होती, पण कोरोनाच्या नव्या लाटेने पुन्हा एकदा चिंता निर्माण केली आहे.

ADVERTISEMENT

IPL 2022 : दिग्गज खेळाडूंची Mega Auction मधून माघार, जाणून घ्या कोण आहेत ते प्लेअर्स?

ADVERTISEMENT

बीसीसीआय सध्या फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या मेगा ऑक्शनची तयारी करत आहे. आयपीएल 2022 स्पर्धा ही एप्रिलमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. मेगा ऑक्शनपूर्वी सर्व खेळाडूंनी आपली नावे दिली आहेत. यावेळी लिलावासाठी 1200 हून अधिक खेळाडूंनी अर्ज केले आहेत.

यावेळी आयपीएलमध्ये एकूण 10 संघ सहभागी होत आहेत. अहमदाबाद आणि लखनऊ हे संघ प्रथमच आयपीएलचा भाग असणार आहेत. सर्व दहा संघांनी लिलावापूर्वी आपापल्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची नावे सादर केली आहेत.

दिग्गज खेळाडूंची Mega Auction मधून माघार

आयपीएलच्या आगामी हंगामासाठीच्या मेगा ऑक्शनसाठी बीसीसीआयने जय्यत तयारी केली आहे. खेळाडूंना आपलं नाव नोंदवण्यासाठी २० जानेवारी ही शेवटची तारीख देण्यात आली होती. यानुसार १ हजार २१४ खेळाडूंनी या मेगा ऑक्शनसाठी अआपलं नाव नोंदवलं आहे. परंतू या मेगा ऑक्शनआधीच काही दिग्गज खेळाडूंनी आगामी हंगामातून माघार घेतली आहे.

ESPNCricinfo ने दिलेल्या माहितीनुसार; ख्रिस गेल, मिचेल स्टार्क, बेन स्टोक्स या खेळाडूंनी लिलावाकरता आपलं नाव नोंदवलं नाहीये. याचसोबत जोफ्रा आर्चर, ख्रिस वोक्स आणि सॅम करन या अनुभवी खेळाडूंनीही माघार घेण्याचं ठरवलंय.

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर, भारताचा अनुभवी स्पिनर रविचंद्रन आश्विन, ड्वेन ब्राव्हो, मिचेल मार्श, श्रेयस अय्यर, शिखर धवन, इशान किशन, सुरेश रैना या सर्व खेळाडूंनी आपली बेस प्राईज २ कोटी ठेवली आहे. याव्यतिरीक्त शाकीब अल हसन, ट्रेंट बोल्ट, स्टिव्ह स्मिथ, क्विंटन डी-कॉक, कगिसो रबाडा यांची बेस प्राईज २ कोटी ठरवण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT