कोरोनाविरुद्ध लढाईत BCCI ही मैदानात, २ हजार Oxygen Concentrators करणार दान

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सध्या संपूर्ण देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. दुसऱ्या लाटेतील देशातील महत्वाच्या राज्यांत आरोग्य यंत्रणेवर ताण आल्याचं चित्र पहायला मिळालं. अनेक ठिकाणी सेलिब्रेटी, क्रिकेटपटू, फिल्मस्टार्स सरकारी यंत्रणांना मदत करत आहेत. अशातच BCCI ही या लढाईत रस्त्यावर उतरलं आहे.

ADVERTISEMENT

BCCI ने प्लान आखला, IPL 2021 चे उर्वरित सामने युएईत?

बीसीसीआयने या लढाईत २ हजार Oxygen Concentrators दान करण्याचं जाहीर केलं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना अनेक राज्यांत ऑक्सिजन अभावी रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले होते. भविष्यात देशामध्ये तिसरी लाट येण्याची शक्यताही अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अशावेळी आरोग्य यंत्रणेवर ताण येऊ नये यासाठी बीसीसीआयने ही मदत केली आहे.

हे वाचलं का?

“कोरोना विषाणूचा सामना करत असताना डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी लढत असलेल्या लढाईची आम्हाला जाण आहे. या विषाणूशी लढण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातली मंडळी आपल्या जीवाचं रान करत आहेत, अशावेळी त्यांच्या या लढाईत या Oxygen Concentrators ची मदत होईल.” अशा शब्दांमध्ये बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर काय आहे? (What exactly is an oxygen concentrator?)

ADVERTISEMENT

ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर हे एखाद्या कॉम्प्युटरच्या मॉनिटर स्क्रिनपेक्षा थोडा मोठा आहे. कोरोनाचे रुग्ण वाढल्याने आणि ऑक्सिजनची कमतरता भासू लागल्यानंतर ऑक्सिजन थेरपीसाठी सर्वात जास्त ज्या उपकराणांना मागणी आहे त्यापैकी ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर हे एक आहे. विशेषत: रुग्णाला घरात आयसोलेशन दरम्यान आणि रुग्णालयात ऑक्सिजनची कमरता असल्यास हे कन्सन्ट्रेटर सर्वात जास्त उपयोगी असल्याचं म्हटलं जात आहे.

ADVERTISEMENT

ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर काम कसं करतं? (How does Oxygen Concentrate work?)

ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर हे एक पोर्टेबल मशीन आहे. ज्याच्या मदतीने रुग्णांसाठी हवेतून ऑक्सिजन तयार केला जातो. ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर प्रेशर स्वेंग ऑबर्झव्हेशन टेक्नोलॉजीच्या वापर करतं. ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर हे अशा जागी वापरलं जातं जिथे द्रव (Liqud) ऑक्सिजन किंवा प्रेश्चरायईज्ड ऑक्सिजनचा वापर हा धोकादायक ठरु शकतो.

घरात किंवा छोट्या क्लिनिकमध्ये याचा वापर करताना ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर हे हवेतून नायट्रोजन वेगळं करतं आणि ऑक्सिजनच्या अधिक असणाऱ्या वायूला बाहेर काढतं. ज्याचा वापर ऑक्सिजनची गरज असणारे रुग्ण करु शकतात. ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर हे औद्योगिक प्रक्रियांमध्ये देखील ऑक्सिजनचा सर्वात स्वस्त स्त्रोत आहे. जिथे यांना ऑक्सिजन गॅस जनरेटर किंवा ऑक्सिजन जनरेशन प्लांट म्हणून ओळखलं जातं.

वातावरणात जवळजवळ 78 टक्के नायट्रोजन आणि 2 1 टक्के ऑकिस्जन आहे. याशिवाय 1 टक्के इतर वायू आहेत. ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर हे हवेतून ऑक्सिजन फिल्टर करण्याचं काम करतं आणि नायट्रोजनसह इतर गॅस सोडण्याचं काम करतं.

ऑक्सिजनची कमतरता असल्यास मेडिकल ऑक्सिजन कन्सन्ट्रेटरने रुग्णाला आपण ऑक्सिजन देऊ शकतो. या यंत्रातून एका नळीद्वारे ऑक्सिजनयुक्त हवा ही रुग्णापर्यंत पोहचवते. जी की, 90 ते 95 टक्के शुद्ध आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT