IPL 2021 Final Preview : CSK की KKR, दुबईत आज कोण मारणार बाजी?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आयपीएलच्या चौदाव्या हंगामाची अखेर आज दुबईत होणार आहे. दोन टप्प्यांमध्ये खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेत चेन्नई सुपरकिंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन संघ अंतिम फेरीत विजेतेपदासाठी लढणार आहेत. त्यामुळे दुबईत आज कोणता संघ विजयाचं सोनं लुटतो हे पाहणं क्रिकेटप्रेमींसाठी महत्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

याआधी चेन्नई सुपरकिंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ २०१२ सालच्या अंतिम फेरीत समोरासमोर आले होते. यावेळी गौतम गंभीरच्या संघाने चेन्नईवर मात करत पहिलं विजेतेपद मिळवलं होतं. त्यामुळे आपल्या या कामगिरीची पुनरावृत्ती करायचा प्रयत्न ओएन मॉर्गनचा KKR संघ करणार आहे. दोन्ही संघांनी या स्पर्धेत मोक्याच्या क्षणी आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवत अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं आहे. त्यामुळे विजेतेपदासाठी कोणाचं पारडं जड आहे यासाठी क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता लागली आहे.

IPL 2021 : KKR अंतिम फेरीत आल्यामुळे CSK च्या चिंता वाढल्या, फायनलचा इतिहास कोलकात्याच्या बाजूने

हे वाचलं का?

दुबईत चेन्नईला विजयाची संधी?

दुबईच्या मैदानाचा विचार केला तर कोलकाता नाईट रायडर्सच्या तुलनेत चेन्नई सुपरकिंग्ज संघाची बाजू वरचढ आहे. चेन्नईने दुबईच्या मैदानावर ४ सामने खेळले असून यापैकी २ सामने ते जिंकले असून KKR चा संघ २ सामन्यांपैकी एका सामन्यात विजयी ठरला आहे.

ADVERTISEMENT

गेल्या हंगामातही ज्यावेळी आयपीएल युएईला हलवण्यात आलं त्यावेळीही चेन्नईचा संघ दुबईत ७ सामने खेळला होता. ज्यापैकी ४ सामन्यांत त्यांना विजय मिळवता आला. त्याउलट KKR चा संघ ३ पैकी २ सामने जिंकला होता. दोन्ही संघाच्या आकडेवारीत फारसा फरक नसला तरीही सध्याच्या घडीला या आकडेवारीच्या निकषावर CSK चं पारडं जड मानलं जात आहे.

ADVERTISEMENT

दोन्ही संघांचा फॉर्म ठरेल कळीचा मुद्दा –

चेन्नईचा संघ साखळी फेरीतले आपले अखेरचा तीन सामने हरुन प्ले-ऑफमध्ये दाखल झाला होता. ज्यानंतर पहिल्या क्वालिफायर सामन्यात त्यांनी दिल्लीवर मात करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. चेन्नईच्या संघात अनुभवी खेळाडूंचा भरणा असल्यामुळे अंतिम सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करुन सामने जिंकायचे कसे हे या संघाला कळलेलं आहे. त्यामुळे या संघाशी दोन हात करताना KKR ला सावध खेळ करावा लागणार आहे.

कोलकाता नाईट रायडर्स या हंगामात दमदार पुनरागमन केलं आहे. भारतात खेळवण्यात आलेल्या हंगामात कोलकात्याचा संघ ७ पैकी ५ सामने हरला होता. या कामगिरीनंत KKR चा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर घसरला होता. परंतू युएईत दाखल झाल्यानंतर या संघाने आपल्या कामगिरीने सर्वांना आश्चर्यचकीत केलं. उर्वरित सामन्यांमध्ये विजय मिळवत चेन्नईने गतविजेत्या मुंबईला नेट रनरेटच्या आधारावर मागे टाकत प्ले-ऑफचं स्थान पटकावलं.

यानंतर पहिल्या एलिमीनेटर सामन्यातही KKR ने RCB वर आणि त्यानंतर दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात दिल्लीला पराभूत करत अंतिम फेरीत स्थान मिळवलं. दुसऱ्या सत्रात संघात केलेले महत्वपूर्ण बदल कोलकात्यासाठी चांगलेच फायदेशीर ठरले.

IPL BLOG: देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी!

याव्यतिरीक्त धोनी विरुद्ध मॉर्गन हा सामना आणखी एका अर्थाने महत्वाचा ठरणार आहे. धोनी आणि मॉर्गन हे दोन्ही वर्ल्डकप विजेते कर्णधार आहेत. धोनीचा या स्पर्धेतला परफॉर्मन्स इतकाचा चांगला नसला तरीही यंदा धोनीने संघाची मोट चांगली बांधली आहे. कोलकाता नाईट रायडर्सने मॉर्गनच्या नेतृत्वाखाली संघात महत्वाचे बदल करुन आपलं आव्हान कायम राखलं आहे. व्यंकटेश अय्यर, शाकीब अल हसन यांचा खुबीने वापर करत KKR ने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. त्यामुळे यंदा दोन विश्वचषक विजेत्या कर्णधारांच्या लढतीत कोण बाजी मारेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT