प्रत्येक इनिंगमध्ये दोन DRS ते सुपर ओव्हर; IPL 2022 साठी नियमांमध्ये महत्वाचे बदल
आयपीएलच्या आगामी हंगामाला २६ मार्चपासून सुरुवात होते आहे. कोविडमुळे यंदाची आयपीएल ही मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये खेळवली जाणार आहे. चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्याने यंदाच्या हंगामाला सुरुवात होईल. या हंगामाला सुरुवात होण्याआधी आयपीएल गव्हर्निंग काऊन्सील आणि बीसीसीआयने नियमांमध्ये महत्वाचे बदल केले आहेत. DRS, प्ले-ऑफ किंवा फायनल च्या सामन्यात सुपरओव्हर आणि […]
ADVERTISEMENT
आयपीएलच्या आगामी हंगामाला २६ मार्चपासून सुरुवात होते आहे. कोविडमुळे यंदाची आयपीएल ही मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये खेळवली जाणार आहे. चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्याने यंदाच्या हंगामाला सुरुवात होईल. या हंगामाला सुरुवात होण्याआधी आयपीएल गव्हर्निंग काऊन्सील आणि बीसीसीआयने नियमांमध्ये महत्वाचे बदल केले आहेत.
ADVERTISEMENT
DRS, प्ले-ऑफ किंवा फायनल च्या सामन्यात सुपरओव्हर आणि अन्य काही महत्वाचे बदल बीसीसीआयने आगामी हंगामासाठी केलेले आहेत.
नियम पहिला – एखाद्या सामन्याआधी एका संघातील खेळाडूंना जर कोरोनाची लागण झाल्याचं समजलं आणि जर त्या संघात १२ खेळाडूंपेक्षा कमी खेळाडू प्लेइंग ११ च्या कॉम्बिनेशनसाठी उपलब्ध असतील तर बीसीसीआय तो सामना पुन्हा एकदा आयोजित करेल. जर हे देखील शक्य झालं नाही तर हे प्रकरण आयपीएलच्या तांत्रिक समितीकडे सोपवलं जाईल. तांत्रिक समितीने दिलेला निर्णय अंतिम आणि सर्वांना मान्य करावा लागेल.
हे वाचलं का?
याआधीच्या नियमाप्रमाणे जर एखाद्या सामन्याआधी संघातील खेळाडूंना कोरोनाची लागण झाली तर बीसीसीआय तो सामना नंतर आयोजित करायचं. जर हे देखील शक्य झालं नाही तर प्रतिस्पर्धी संघाला दोन पॉईंट दिले जायचे.
दुसरा नियम – प्रत्येक इनिंगमध्ये आता संघांना दोन DRS च्या संधी मिळणार आहे.
ADVERTISEMENT
तिसरा नियम – काही दिवसांपूर्वी MCC ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमांमध्ये बदल केले होते. त्यातीलच एका नियमाची अंमलबजावणी बीसीसीआय यंदाच्या आयपीएलमध्ये करणार आहे. ज्यात एखादा खेळाडू कॅचआऊट होत असताना जरीही त्याने क्रिज अर्ध्यावर ओलांडली असली तरीही त्यानंतर येणारा नवीन खेळाडू स्ट्राईक एंडला उतरेल.
ADVERTISEMENT
चौथा नियम – जर प्ले-ऑफ आणि अंतिम सामन्यात सुपरओव्हरमध्ये सामन्याचा निकाल लागला नाही तर जो संघ साखळी फेरीत सर्वोच्च स्थानी असेल त्याला विजेता म्हणून घोषित केलं जाईल.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT