धक्कादायक ! गीता फोगटच्या बहिणीची आत्महत्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भारतीय कुस्तीपटू गीता फोगट हिच्या मामे बहिणीनी आत्महत्या केली आहे. 17 वर्षांच्या रितीकाने आत्महत्या केल्याचं समजताच एकच खळबळ उडाली. समोर आलेल्या माहितीप्रमाणे, रितीका राजस्थानच्या स्टेट लेवल सब ज्युनियर टुर्नामेंट हरली. ही टुर्नांमेंट हरल्याचा तिला फार मोठा धक्का बसला आणि तिने आत्महत्येसारखं पाऊल उचललं.

ADVERTISEMENT

दरम्यान पोलीस या सर्व प्रकरणाचा तपास करत आहेत. रितीकाच्या आत्महत्येनंतर गीताने देखील सोशल मीडियावरून दुःख व्यक्त केलं आहे. गीता तिच्या ट्विटमध्ये म्हणते, रितीका एक खूप चांगली कुस्तीपटू होती. माहिती नाही तिने इतक्या टोकाचा निर्णय का घेतला. जिंकणं-हरणं हे खेळाडूच्या जीवनाचा एक हिस्सा असतो. मात्र असं पाऊल कोणीही उचलू नये.

रितीकाची 14 मार्चला भरतपूरमध्ये फायनल होती. या मॅचमध्ये तिला केवळ एका पॉईंटने हार पत्करावी लागली. हरल्याचा हा धक्का पचवू न शकल्याने 17 मार्च रोजी तिने फाशी लावून आत्महत्या केली. दरम्यान संदर्भात चरखी दादरीचे डीएसपी राम सिंग बिश्नोई म्हणाले, रितीकाच्या मृत्यूमागे तिच्या हरण्याचं कारण असू शकतं. यासंदर्भात आम्ही तपास करतोय.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT