Surykumar Yadav : टीम इंडियाला मोठा धक्का, सूर्यकुमार यादव ‘या’ गंभीर आजाराने ग्रस्त
सूर्यकुमार यादव देशांतर्गत आणि आयपीएलच्या सुरुवातीच्या सामान्यांना मुकावं लागणार असल्याची शक्यता आहे. कारण सु्र्यकुमार यादववर हर्नियाची शस्त्रक्रिया करावी लागणार आहे.
ADVERTISEMENT
Surykumar Yadav Hernia injury : टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. कारण टीम इंडियाचा स्टार फलंदाज मिस्टर 360 सुर्यकुमार यादव देशांतर्गत क्रिकेटसह आयपीएलला मुकण्याची शक्यता आहे. कारण सूर्यकुमार यादवला (Surykumar Yadav) गंभीर आजार झाला आहे. या गंभीर आजारामुळेच तो आगामी स्पर्धांना मुकणार असल्याचा माहिती आहे. यामुळे आता टीम इंडियासह (Team India) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाला धक्का बसला आहे. (ind vs afg surykumar yadav hernia injury due to this out of domestic cricket and miss ipl 2024)
ADVERTISEMENT
सूर्यकुमार यादवने अलीकडेच दक्षिण आफ्रिकेत टीम इंडियाचे नेतृत्व केले होते. मात्र या मालिके दरम्यान त्याला घोट्याच्या दुखापतीमुळे अफगाणिस्तान मालिकेतून बाहेर पडावे लागले होते. त्यात आता सूर्यकुमार यादव देशांतर्गत आणि आयपीएलच्या सुरुवातीच्या सामान्यांना मुकावं लागणार असल्याची शक्यता आहे. कारण सूर्यकुमार यादववर हर्नियाची शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. ही शस्त्रक्रिया जर्मनीत पार पडणार आहे. त्यामुळे त्याला आगामी स्पर्धांना मुकावे लागणार आहे.
हे ही वाचा : Sanjay Raut : न्यायमूर्ती आरोपीकडे चहा प्यायला लागले तर…’, राऊतांकडून नार्वेकरांवर झोंबणारी टीका
नेमका आजार काय झालाय?
सूर्यकुमार यादवला स्पोर्ट्स हर्निया आहे. सध्या तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमी बंगळुरूमध्ये आहे. दोन-तीन दिवसांत तो म्युनिक, जर्मनीला जाईल तिथे त्याच्यावर उपचार केले जातील. याचाच अर्थ तो यंदा रणजीमध्ये मुंबईकडून खेळणार नाही आणि आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या सुरुवातीच्या सामन्यांनाही मुकणार आहे, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्राने टाईम्स ऑफ इंडियाला दिली आहे.
हे वाचलं का?
दरम्यान 2022 ला विकेटकिपर केएल राहुलला देखील स्पोर्ट्स हर्नियाचा त्रास झाला होता, त्यानंतर गेल्या वर्षी जुलैमध्ये महिन्यात त्याच्यावर शस्त्रक्रिया पार पडली होती. त्यामुळे राहुल काही महिने क्रिकेटपासून दुर होता.
स्पोर्ट्स हर्निया म्हणजे काय?
स्पोर्ट्स हर्निया म्हणजे स्नायू, अस्थिबंधन किंवा कंडरामध्ये ताण किंवा फाटणे. याशिवाय तुमच्या पोटाच्या खालच्या भागातही हे होऊ शकते. खेळ खेळणाऱ्या लोकांमध्ये स्पोर्ट्स हर्निया अधिक सामान्य आहे. जे खेळाडू फुटबॉल, कुस्ती किंवा आइस हॉकी खेळतात त्यांना स्पोर्ट्स हर्निया जास्त प्रमाणात आढळतो. जोहान्सबर्गमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी-20 दरम्यान सूर्याला ही दुखापत झाली होती. यामुळे सूर्यकुमार यादवचा अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आलेला नाही.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Ram Mandir सोहळ्याचं CM शिंदेंना आमंत्रण, पण ठाकरेंना नाही; हे आहे कारण
दरम्यान टी-20 वर्ल्ड कप जून 2024 मध्ये खेळवला जाणार आहे. तत्पुर्वी जर सुर्यकुमार यादव जर बरा झाला नाही तर टीम इंडियाची डोकेदुखी वाढणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT