IND vs AFG : अफगाणिस्तानविरूद्ध टी20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, विराट-रोहितला संधी मिळाली का?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

ind vs afg t20 bcci announce team india squad for t20 series against afghanistan rohit sharma captain
ind vs afg t20 bcci announce team india squad for t20 series against afghanistan rohit sharma captain
social share
google news

Indian Squad For Afghanistan Series : अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेआधी विराट कोहली आणि रोहित शर्माला संघात स्थान मिळेल की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. अखेर या मालिकेसाठी रोहित शर्माकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. तर विराट कोहलीही टी20 फॉरमॅटमध्ये परतला आहे. त्यामुळे या दोन सिनियर खेळाडूंसोबत आता टीम इंडियाची युवा बिग्रेड मैदानात खेळताना दिसणार आहे. (ind vs afg t20 bcci announce team india squad for t20 series against afghanistan rohit sharma captain)

ADVERTISEMENT

अफगाणिस्तानविरूद्ध टी20 मालिकेसाठी कर्णधारपद कुणाकडे सोपवाव हा बीसीसीआयपुढे मोठा प्रश्न होता. कारण हार्दिक पांड्या वर्ल्ड कप दरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. तर सुर्यकुमार यादवला देखील दुखापत झाली होती. त्यामुळे टी20 चे कर्णधारपद कुणाकडे सोपवावे हा मोठा प्रश्न होता. असे असतानाच आगामी टी20 मालिकेसाठी उपलब्ध असल्याची माहिती कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहली यांनी बीसीसीआयला दिली होती. अशा स्थितीत दोन्ही खेळाडूंकडे दुर्लक्ष करणे फार कठीण होते, त्यामुळे त्यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.

हे ही वाचा : मुंबईत घातपात घडवण्याचा कट; बोरिवलीतून 6 जणांना अटक, ‘हे’ आरोपी आहेत तरी कोण?

सिराज – बुमराहला विश्रांती

अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी निवड समितीने वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती दिली आहे. केपटाऊन कसोटीत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विजयात सिराज आणि बुमराहने महत्त्वाची भूमिका बजावली होती. हे दोन्ही वेगवान गोलंदाज आता इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळणार आहेत. या दोन्ही गोलंदाजांनी इंग्लंड मालिकेसाठी पूर्णपणे फ्रेश राहावे, अशी भारतीय संघ व्यवस्थापनाची इच्छा आहे.

हे वाचलं का?

भारतीय संघ आणि अफगाणिस्तान यांच्यातील मालिकेतील पहिला सामना 11 जानेवारी रोजी मोहाली येथे होणार आहे. त्यानंतर 14 जानेवारीला उभय संघांमधील दुसरा टी-20 सामना इंदूरमध्ये खेळवला जाईल. त्यानंतर बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर टी-२० मालिकेतील शेवटचा सामना खेळवला जाईल.

सामन्याचे वेळापत्रक

पहिला टी20 : 11 जानेवारी, मोहाली, संध्याकाळी 7 वाजता
दुसरा टी20 : 14 जानेवारी, इंदूर, संध्याकाळी 7 वाजता
तिसरा टी20 : 17 जानेवारी, बंगळुरू, संध्याकाळी 7 वाजता

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Sharad Mohol च्या हत्येनंतर पत्नीने घेतली फडणवीसांची भेट, गृहमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकिपर), संजू सॅमसन (विकेटकिपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप यादव , आवेश खान आणि मुकेश कुमार.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT