Ind vs Eng : Lords कसोटीत इंग्लंडच्या खेळाडूंकडून Ball Tampering चा प्रयत्न? व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्सच्या मैदानावर सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आणखी एका वादाला तोंड फुटलं आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघ फलंदाजी करत असताना इंग्लंडच्या खेळाडूंनी बॉल टॅम्परिंगचा प्रयत्न केल्याचा आरोप सोशल मीडियावर होताना दिसत आहे.

ADVERTISEMENT

इंग्लंडचे खेळाडू पायाने बॉलशी छेडछाड करतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यावरुन इंग्लंडच्या खेळाडूंनी बॉल टॅम्परिंग केलं का? असा प्रश्न विचारला जात आहे.

क्रिकेटपटूंच्या बुटांना स्पाईक असतात…जेणेकरुन धावताना ग्रिप मजबूत बसते. इंग्लंडच्या खेळाडूंनी या स्पाईकचा वापर करत बॉलची शिवण बदलण्याचा प्रयत्न केल्याचं व्हिडीओत दिसत आहे. बॉलची शिवण बदलली किंवा त्यात काही छेडछाड केली तर रिव्हर्स स्विंग होण्यासाठी मदत होते. इंग्लंडच्या वातावरणात बॉल रिव्हर्स स्विंग करण्यासाठी खेळाडूंनी हे कृत्य केल्याचा सूर सोशल मीडियावर पहायला मिळतो आहे.

हे वाचलं का?

Ind vs Eng 2nd Test : भर मैदानात भिडले कोहली-अँडरसन, वादावादीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

अद्याप या प्रकरणावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रीया समोर आलेली नाहीये. २०१८ साली दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामन्यात बॉल टॅम्परिंग वादामुळे संपूर्ण क्रिकेट विश्व हादरलं होतं. ज्यानंतर स्टिव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमरुन बॅन्क्रॉफ्टवर बंदी घालण्यात आली होती. ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी सँडपेपरच्या सहाय्याने बॉलची ठेवण बदलवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे या प्रकरणात आता नेमक्या काय घडामोडी घडतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

Video : क्रिकेटच्या पंढरीत प्रेक्षकांचं लाजिरवाणं कृत्य, लोकेश राहुलला फेकून मारले शॅम्पेन कॉर्क

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT