Ind vs Eng : गुडघ्यातून भळाभळा रक्त येत असतानाही Anderson बॉलिंग करत राहिला, सोशल मीडियावर कौतुक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

लीड्स कसोटी सामन्यात डावाने पराभव स्विकारावा लागलेल्या टीम इंडियाची ओव्हल टेस्टमध्येही खराब सुरुवात झाली. इंग्लंडच्या जलदगती माऱ्यासमोर भारतीय संघाचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. कॅप्टन विराट कोहली आणि अखेरच्या फळीत शार्दुल ठाकूरने केलेल्या फटकेबाजीमुळे सरतेशेवटी भारताने आव्हानात्मक धावसंख्या गाठली. यादरम्यान इंग्लंडचा बॉलर जेम्स अँडरसनच्या एका कृतीमुळे सर्व प्रेक्षक थक्क झालेले पहायला मिळाले.

ADVERTISEMENT

जेम्स अँडरसनच्या गुडघ्याला दुखापत झालेली असतानाही तो मैदानात खेळत होता. 39 वर्षीय वेगवान गोलंदाजाची ट्राऊजर गुडघ्याजवळ रक्ताने माखली होती तरीही तो गोलंदाजी करत राहिला. अँडरसन काहीसा लंगडत चालतानाची दृष्य टीव्ही स्क्रिनवर दाखवण्यात आल्यानंतर प्रेक्षकही काहीकाळ स्तब्ध झाले.

टॉस जिंकून इंग्लंडचा कॅप्टन जो रुटने पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल या सलामीवीरांनी सावध सुरुवात केली. परंतू इंग्लंडच्या बॉलर्सची भारतीय डावाला खिंडार पाडण्यात यश मिळवलं. रोहित शर्मा, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा हे ठराविक अंतराने माघारी परतले. बदल म्हणून भारताने अजिंक्य रहाणेऐवजी रविंद्र जाडेजालाही वर संधी देऊन पाहिली. परंतू तिकडेही भारताच्या पदरी अपयशच आलं. विराटने एक बाजू लावून धरत अर्धशतक झळकावलं.

हे वाचलं का?

परंतू रॉबिन्सनने त्याला ५० धावांवर आऊट करत भारताला आणखी एक धकर्का दिला. टीम इंडिया संकटात सापडलेली असताना मुंबईकर शार्दुल ठाकूरने उमेश यादवच्या साथीने अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. ३६ बॉलमध्ये ५७ धावांची खेळी करुन शार्दुल ठाकूरही माघारी परतला. यानंतर भारताचे उर्वरित फलंदाज फारशी चमक दाखवू शकले नाही आणि १९१ रन्सवर भारताचा पहिला डाव संपुष्टात आला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT