Ind vs Eng : घुसखोरी करणारा Jarvo पुन्हा मैदानात, इंग्लंडच्या बॅट्समनला येऊन धडकला…पाहा Video

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भारत आणि इंग्लंड यांच्यात ओव्हलच्या मैदानावर सुरु असलेल्या सामन्यात यजमान इंग्लंडने पहिल्या डावात महत्वपूर्ण आघाडी घेतली आहे. पहिल्या दिवसाअखेरीस इंग्लंडच्या ३ फलंदाजांना माघारी धाडण्यात भारताला यश आलं. दुसऱ्या दिवशीही भारताने दोन विकेट घेत इंग्लंडचा निम्मा संघ गारद केला. परंतू ऑली पोप, जॉनी बेअरस्टो आणि मोईन अली यांच्या महत्वपूर्ण खेळामुळे इंग्लंडने पहिल्या डावात आघाडी घेतली.

ADVERTISEMENT

यादरम्यान मैदानावर पुन्हा एकदा एक विचित्र प्रसंग अनुभवायला मिळाला. गेल्या काही सामन्यांत सुरक्षाकवच भेदून मैदानात येणाऱ्या जार्वो या टीम इंडियाच्या फॅनने पुन्हा एकदा तसाच प्रकार करुन दाखवला.

जॉनी बेअरस्टो आणि ऑली पोप मैदानावर असताना भारताचा उमेश यादव बॉलिंग करत होता. इतक्यात जार्वोने मैदानावरील सुरक्षा रक्षकांना चकवून थेट आत प्रवेश केला आणि तो बॉलिंगच्या प्रयत्नात थेट बेअरस्टोला जाऊन धडकला. पाहा हा व्हिडीओ…

हे वाचलं का?

यानंतर मैदानातील सुरक्षा रक्षकांनी पुन्हा एकदा जार्वोला बाहेर काढलं. परंतू इंग्लंडला झटपट गुंडाळण्यात अपयशी ठरलेल्या टीम इंडियाला आता दुसऱ्या डावात इंग्लंडने घेतलेली आघाडी पार करुन विजयासाठी टार्गेट देण्याचं मोठं आव्हान असणार आहे.

Ind vs Eng : गुडघ्यातून भळाभळा रक्त येत असतानाही Anderson बॉलिंग करत राहिला, सोशल मीडियावर कौतुक

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT