Ind vs NZ : कसोटी विजयापासून भारत पाच पावलं दूर; गोलंदाजांचा भेदक मारा
मुंबईच्या वानखेडे मैदानावर सुरु असलेल्या भारत आणि न्युझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यावर भारताने मजबूत पकड बसवली आहे. ५४० धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडने तिसऱ्या दिवसाअखेरीस ५ विकेट गमावत १४० धावांपर्यंत मजल मारली आहे. भारतीय संघाकडून आश्विनने पुन्हा एकदा आपल्या फिरकीची जादू दाखवत न्यूझीलंडच्या फलंदाजांना आपल्या जाळ्यात अडकवलं. न्यूझीलंडला पहिल्या डावात ६२ रन्सवर गुंडाळल्यानंतर भारताने […]
ADVERTISEMENT
मुंबईच्या वानखेडे मैदानावर सुरु असलेल्या भारत आणि न्युझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यावर भारताने मजबूत पकड बसवली आहे. ५४० धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडने तिसऱ्या दिवसाअखेरीस ५ विकेट गमावत १४० धावांपर्यंत मजल मारली आहे. भारतीय संघाकडून आश्विनने पुन्हा एकदा आपल्या फिरकीची जादू दाखवत न्यूझीलंडच्या फलंदाजांना आपल्या जाळ्यात अडकवलं.
ADVERTISEMENT
न्यूझीलंडला पहिल्या डावात ६२ रन्सवर गुंडाळल्यानंतर भारताने फॉलोऑन न देता बॅटींग करण्याचा निर्णय केला. दुसऱ्या दिवसाअखेरीस भारतीय संघाने एकही विकेट न गमावता ६९ रन्सपर्यंत मजल मारली. दुसऱ्या दिवसाअखेरीस भारताकडे ३३२ धावांची आघाडी होती. त्यामुळे सामन्यावर पकड घेत भारताने न्यूझीलंडला पूर्णपणे बॅकफूटला ढकललं.
तिसऱ्या दिवशीही मयांक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजारा जोडीने चांगली सुरुवात करुन दिली. दोघांमध्येही पहिल्या विकेटसाठी १०७ धावांची भागीदारी झाली. पहिल्या डावात शतक झळकावलेल्या मयांक अग्रवालने दुसऱ्या डावात हाफ सेंच्युरी केली. एजाज पटेलने अग्रवालला आऊट करत भारताला पहिला धक्का दिला. ठराविक अंतराने चेतेश्वर पुजाराही एजाज पटेलच्या जाळ्यात अडकून ४७ धावांवर आऊट झाला.
हे वाचलं का?
यानंतर शुबमन गिल आणि विराट कोहलीने तिसऱ्या विकेटसाठी छोटेखानी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. परंतू तोपर्यंत भारताने सामन्यावर आपलं वर्चस्व निर्माण केलं होतं. यानंतर भारतीय फलंदाजांनी आक्रमक पवित्रा आजमावत फटकेबाजी करुन संघाला पाचशे धावांची आघाडी मिळवून दिली. ७ बाद २७६ वर विराट कोहलीने भारताचा दुसरा डाव घोषित करत न्यूझीलंडला विजयासाठी ५४० धावांचं मोठं आव्हान दिलं.
दुसऱ्या डावातही न्यूझीलंडची सुरुवात अडखळतच झाली. केन विल्यमसनच्या जागेवर कर्णधारपद सांभाळणारा टॉम लॅथम आश्विनच्या बॉलिंगवर ६ रन काढून आऊट झाला. यानंतर विल यंग आणि डॅरेल मिचेलने दुसऱ्या विकेटसाठी भागीदारी रचून डाव सावरला. परंतू आश्विनने यंगचा अडसर दूर करत संघाला आणखी एक यश मिळवून दिलं. अनुभवी रॉस टेलरनेही हाराकिरी करत आपली विकेट फेकली.
ADVERTISEMENT
परंतू यानंतर एक बाजू लावून उभ्या राहिलेल्या मिचेलने हेन्री निकोल्सच्या साथीने न्यूझीलंडला शतकी धावसंख्येचा टप्पा ओलांडून दिला. यादरम्यान मिचेलने आपलं अर्धशतकही पूर्ण केलं. परंतू अक्षर पटेलच्या बॉलिंगवर उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो आऊट झाला. मिचेलने ९२ बॉलमध्ये ७ चौकार आणि २ षटकार लगावत ६० धावांची इनिंग खेळली. पाठोपाठ टॉम ब्लंडलही चोरटी धाव काढण्याच्या प्रयत्नात रनआऊट झाल्यामुळे न्यूझीलंडची अवस्था आणखीनच नाजूक झाली. यानंतर रचिन रविंद्र आणि हेन्री निकोल्स यांनी उर्वरित षटकं खेळून काढत संघाची पडझड रोखली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT