T20 World Cup : रोहित शर्माकडून भारताला आशा, परंतू पाकिस्तानविरुद्धची कामगिरी ठरु शकते चिंतेचा विषय
टी-२० विश्वचषकात आज बहुचर्चित भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खेळवला जाणार आहे. तब्बल दोन वर्षांनी भारत आणि पाकिस्तान हे संघ समोरासमोर येणार आहेत. या सामन्यात भारतीय फलंदाजांवर मोठी जबाबदारी असणार आहे. युएईच्या खेळपट्ट्यांवर भारतीय खेळाडूंनी आताच आयपीएलचे सामने खेळले आहेत. रोहित शर्मा हा भारतीय फलंदाजीचा कणा मानला जातो. त्यामुळे आजच्या सामन्यात रोहितवर मोठी जबाबदारी असणार आहे. […]
ADVERTISEMENT
टी-२० विश्वचषकात आज बहुचर्चित भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खेळवला जाणार आहे. तब्बल दोन वर्षांनी भारत आणि पाकिस्तान हे संघ समोरासमोर येणार आहेत. या सामन्यात भारतीय फलंदाजांवर मोठी जबाबदारी असणार आहे. युएईच्या खेळपट्ट्यांवर भारतीय खेळाडूंनी आताच आयपीएलचे सामने खेळले आहेत. रोहित शर्मा हा भारतीय फलंदाजीचा कणा मानला जातो. त्यामुळे आजच्या सामन्यात रोहितवर मोठी जबाबदारी असणार आहे.
ADVERTISEMENT
परंतू गेल्या काही सामन्यांपासून रोहितचा खराब फॉर्म हा भारतीय संघासाठी चिंतेचा विषय ठरु शकतो. आयपीएलमध्येही काही सामन्यांचा अपवाद वगळला तर रोहितची बॅट शांतच होती. इंग्लंडविरुद्ध सराव सामन्याआधी झळकावलेल्या अर्धशतकामुळे रोहितला आत्मविश्वास आला असेल. परंतू टी-२० क्रिकेटमध्ये पाकिस्तानी संघाविरुद्धची रोहितची कामगिरी ही भारतासाठी चिंतेचा विषय ठरु शकते.
रोहितने पाकिस्तानविरुद्ध एकूण ७ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यात तो विशेष असा प्रभाव पाडू शकलेला नाही. या दरम्यान, रोहितला ६ सामन्यांमध्ये फलंदाजीची संधी मिळाली आणि त्याने १७.५० च्या सरासरीने ७० धावा केल्या आहेत. मात्र, त्याचा स्ट्राइक रेट १२९.६२ इतका राहिला आहे. त्याने टी२० मध्ये पाकिस्तानविरुद्ध नाबाद ३० धावांची आपली सर्वोच्च खेळी खेळली आहे. रोहितने पाकिस्तान विरुद्ध आपला पहिला सामना २००७ साली खेळला होता. याच सामन्यात त्याने आपली सर्वोच्च खेळी खेळली होती.
हे वाचलं का?
T20 World Cup : Ind vs Pak सामना मोबाईलवरही विनामूल्य पाहू शकता, जाणून घ्या कसं?
भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित भारत-पाकिस्तान टी२० सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत १० व्या क्रमांकावर आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने ६ सामन्यांत २५४ धावा करून अव्वल स्थान पटकावले आहे. २०१६ च्या विश्वचषकात रोहितने पाकिस्तानविरुद्ध शेवटचा टी२० सामना खेळला होता. या सामन्यात त्याने सलामीवीराची भूमिका बजावली होती. रोहितने या सामन्यात ११ चेंडूत फक्त १० धावा करून त्याची विकेट गमावली होती.
ADVERTISEMENT
Video : ओ भाई मारो मुझे…म्हणणारा तो पाकिस्तानी मुलगा Ind vs Pak सामन्याआधी पुन्हा चर्चेत
ADVERTISEMENT
पाकिस्तानविरुद्ध रोहितने टी२० सामन्यांपेक्षा एकदिवसीय सामन्यात अधिक वर्चस्व गाजवले आहे. त्याने पाकिस्तानविरुद्ध १६ एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यात त्याने ५१.४३ च्या सरासरीने आणि ८८.७८ च्या स्ट्राईक रेटने ७२० धावा केल्या आहेत. यात त्याने २ शतके आणि ६ अर्धशतके देखील केली आहेत. आपल्या खेळ्यांदरम्यान तो दोनदा नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतला आहे.
रोहितने पाकिस्तानविरुद्ध शेवटचा सामना २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषकात खेळला होता. या सामन्यात त्याने ११३ चेंडूत १४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने १४० धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली होती.
T20 World Cup : ६-० च्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरणार, पाकिस्तानविरुद्ध आज महामुकाबला
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT