Ind vs SL : टी-२० सिरीजमध्ये भारताची विजयी सुरुवात, पहिल्या सामन्यात श्रीलंकेवर मात
वन-डे मालिका खिशात घातलेल्या भारतीय संघाने टी-२० मालिकेची सुरुवातही दिमाखात केली. आहे. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने श्रीलंकेला पहिल्या सामन्यात ३८ रन्सनी हरवत ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. सूर्यकुमार यादवचं अर्धशतक आणि भारतीय बॉलर्सनी केलेल्या सांघिक कामगिरीच्या जोरावर भारताने या सामन्यात बाजी मारली. टॉस जिंकून श्रीलंकेने पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय केला. टी-२० क्रिकेटमध्ये […]
ADVERTISEMENT
वन-डे मालिका खिशात घातलेल्या भारतीय संघाने टी-२० मालिकेची सुरुवातही दिमाखात केली. आहे. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने श्रीलंकेला पहिल्या सामन्यात ३८ रन्सनी हरवत ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. सूर्यकुमार यादवचं अर्धशतक आणि भारतीय बॉलर्सनी केलेल्या सांघिक कामगिरीच्या जोरावर भारताने या सामन्यात बाजी मारली.
ADVERTISEMENT
टॉस जिंकून श्रीलंकेने पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय केला. टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या मुंबईकर पृथ्वी शॉची सुरुवात खराब झाली. दुष्मंता चमीराने त्याला पहिल्याच बॉलवर आऊट केलं. टी-२० क्रिकेटमधलं शॉचं पदार्पण फारसं चांगलं झालं नाही. यानंतर कॅप्टन शिखर धवन आणि संजू सॅमसन यांनी छोटेखानी भागीदारी करत भारताचा डाव सावरला. संजू सॅमसन चांगल्या फॉर्मात आहे असं वाटत असतानाच २७ रन्स काढून तो माघारी परतला.
यानंतर सूर्यकुमार यादव आणि शिखर धवनने भारताचा डाव सावरला. दोघांनीही तिसऱ्या विकेटसाठी ६२ रन्सची पार्टनरशीप केली. यादरम्यान सूर्यकुमारने आपलं अर्धशतकही साजरं केलं. फटकेबाजी करणारा भारताचा कॅप्टन शिखर धवन करुणरत्नेच्या बॉलिंगवर आऊट झाला. शिखरने ३६ बॉलमध्ये ४ फोर आणि १ सिक्स लगावत ४६ रन्स केल्या. अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात सूर्यकुमारही आऊट झाला, त्याने ५० रन्स केल्या. यानंतर इशान किशन आणि कृणाल पांड्याने भारताला ११५ रन्सचा टप्पा गाठून दिला.
हे वाचलं का?
प्रत्युत्तरादाखल श्रीलंकेने आश्वासक सुरुवात केली. कृणाल पांड्याने मिनोद भनुकाला आऊट करत श्रीलंकेला पहिला धक्का दिला. यानंतर ठराविक अंतराने धनंजय डी-सिल्वाही चहलच्या बॉलिंगवर क्लिन बोल्ड झाला. लागोपाठ अविष्का फर्नांडोही माघारी परतल्यामुळे लंकेच्या अडचणींमध्ये भर पडली. चरीथ असलंकाने एक बाजू लावून धरत भारतावर दडपण आणण्यास सुरुवात केली.
असलंकाने २६ बॉलमध्ये ३ फोर आणि ३ सिक्स लगावत ४४ रन्स केल्या. परंतू भारतीय बॉलर्सनी ठराविक अंतराने विकेट घेत श्रीलंकेच्या फलंदाजांना स्थिरावण्याची संधी दिली नाही. भारताकडून भुवनेश्वर कुमारने ४, दीपक चहरने २ तर कृणाल-चहल-हार्दिक आणि वरुण चक्रवर्ती यांनी १-१ विकेट घेतली. या विजयासह भारताने टी-२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
ADVERTISEMENT
IPL 2021 : १९ सप्टेंबरपासून उर्वरित हंगामाला सुरुवात, MI vs CSK मध्ये रंगणार पहिला सामना
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT