Omicron ची भीती, टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौऱ्यात बदल; टी-२० सामने नंतर खेळवणार
दक्षिण आफ्रिकेतल्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा फटका टीम इंडियालाही बसला आहे. भारतीय संघाच्या आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात या विषाणूच्या भीतीमुळे बदल करण्यात आला आहे. नियोजीत वेळापत्रकानुसार टीम इंडिया आफ्रिका दौऱ्यात ३ कसोटी, ३ वन-डे आणि ४ टी-२० सामने खेळणार होती. परंतू ओमिक्रॉनच्या भीतीमुळे यात बदल करण्यात आला आहे. टीम इंडिया आता दक्षिण आफ्रिकेत ३ कसोटी आणि ३ […]
ADVERTISEMENT
दक्षिण आफ्रिकेतल्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा फटका टीम इंडियालाही बसला आहे. भारतीय संघाच्या आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात या विषाणूच्या भीतीमुळे बदल करण्यात आला आहे. नियोजीत वेळापत्रकानुसार टीम इंडिया आफ्रिका दौऱ्यात ३ कसोटी, ३ वन-डे आणि ४ टी-२० सामने खेळणार होती. परंतू ओमिक्रॉनच्या भीतीमुळे यात बदल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
टीम इंडिया आता दक्षिण आफ्रिकेत ३ कसोटी आणि ३ वन-डे सामने खेळणार असून टी-२० सामन्यांची मालिका नंतर खेळवली जाईल अशी माहिती बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी ANI शी बोलताना दिली आहे. टीम इंडिया निजोयीत वेळापत्रकानुसार दक्षिण आफ्रिकेत खेळण्यासाठी कटीबद्ध असल्याचं बीसीसीआयने सांगितलं आहे.
India to tour SA for three Tests, three ODIS, T20Is to be played later: Jay Shah
Read @ANI Story | https://t.co/SOjHuZ077r#IndianCricketTeam pic.twitter.com/KTBrdoQnQA
— ANI Digital (@ani_digital) December 4, 2021
परंतू सध्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे तयार झालेली परिस्थिती पाहता या दौऱ्यात बदल करणं गरजेचं असून याबद्दल दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाशी चर्चा झाल्याचंही बीसीसीआयने सांगितलं. या दौऱ्यात सर्व खेळाडू हे कठोर बायो सिक्युअर बबलमध्ये वावरणार आहेत. टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी विशेष चार्टर्ड विमानाची सोय केली जाणार असल्याचंही बीसीसीआयने सांगितलं आहे.
हे वाचलं का?
खराब फॉर्मचा फटका ! Rahane चं उप-कर्णधारपद जाण्याचे संकेत, Rohit Sharma कडे सूत्र जाण्याची शक्यता
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT