IND vs SL T20 : शिवम मावीचा पदार्पणातच धमाका; श्रीलंकेविरुद्ध रोमहर्षक विजय
मुंबई : भारत विरुद्ध श्रीलंका पहिल्या टी-20 सामन्यात भारतानं दोन धावांनी दणदणीत विजय मिळविला. वानखेडे स्टेडियमवर खेळवला गेलेला हा सामना अखेरच्या बॉलपर्यंत रंगतदार अवस्थेमध्ये होता. शेवटच्या चार बॉल्समध्ये लंकेला 11 धावांची गरज असताना चमिका करुनारत्नेनं सिक्स मारून सामन्यात रंगत आणली. पण त्यानतंर पुढच्याच चेंडूवर कसून रजिथा धावबाद झाला. अखेरच्या चेंडूवर श्रीलंकेला चार धावांची गरज होती. […]
ADVERTISEMENT
मुंबई : भारत विरुद्ध श्रीलंका पहिल्या टी-20 सामन्यात भारतानं दोन धावांनी दणदणीत विजय मिळविला. वानखेडे स्टेडियमवर खेळवला गेलेला हा सामना अखेरच्या बॉलपर्यंत रंगतदार अवस्थेमध्ये होता. शेवटच्या चार बॉल्समध्ये लंकेला 11 धावांची गरज असताना चमिका करुनारत्नेनं सिक्स मारून सामन्यात रंगत आणली. पण त्यानतंर पुढच्याच चेंडूवर कसून रजिथा धावबाद झाला. अखेरच्या चेंडूवर श्रीलंकेला चार धावांची गरज होती.
ADVERTISEMENT
आजच्या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने याचा फायदा उचलतं आक्रमक सुरुवात केली. सलामीवीर इशान किशनने पहिल्या षटकात धमाका केला. त्याने 2 चौकार आणि 1 षटकार मारत रजिताला 17 धावा चोपल्या. पण तिसऱ्या षटकात श्रीलंकेच्या तीक्षाणाने टी 20 पदार्पण करणाऱ्या शुभमन गिलला 7 धावांवर बाद केलं. शुभमन गिल बाद झाल्यानंतर भारताची धावगती थोडी मंदावली. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमन्सन हेही दोघे स्वस्तात माघारी परतले.
हार्दिक पांड्या आणि इशान किशनने चौथ्या विकेटसाठी 31 धावांची भागीदारी रचत धावसंख्या सावरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दीपक हुड्डा आणि अक्षर पटेल यांनी सहाव्या विकेटसाठी 35 चेंडूत नाबाद 68 धावांची भागीदारी रचली. त्यामुळे भारताने 20 षटकात 5 बाद 162 धावांपर्यंत मजल मारली.
हे वाचलं का?
प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या श्रीलंकेला शिवम मावीने चार धक्के दिले. पथूम निसंका, धनंजय डिसिल्वा, वानिंदु हसरंगा आणि अखेरच्या षटकात महिष तीक्षणाला बाद करत पदार्पणात चार बळी घेण्याची कामगिरी मावीने केली. याशिवाय उमरान मलिक आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करत विजयात मोलाची कामगिरी बजावली. श्रीलंकेकडून कर्णधार शनाकाने सर्वाधिक 45 धावा केल्या.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT