Tokyo Olympic 2020 : अर्जेंटिनावर मात करत भारतीय हॉकीची घौडदौड सुरुच

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाची विजयी घौडदौड कायम राहिलेली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मानहानीकारक पराभवानंतर भारताने दमदार कमबॅक करत स्पेनला ३-० ने हरवलं. यानंतर आज झालेल्या सामन्यात भारताने २०१६ रिओ ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या अर्जेंटिनाचाही ३-१ ने धुव्वा उडवला.

ADVERTISEMENT

दोन्ही संघांमधला सामना खऱ्या अर्थाने अटीतटीचा झाला. मध्यांतरापर्यंत एकही संघ गोल करण्यात अपयशी ठरला. ऑस्ट्रेलियाकडून १-७ च्या फरकाने पराभव स्विकारावा लागल्यानंतर भारताला अर्जेंटिनाविरुद्ध सामन्यात विजय आवश्यक होता. परंतू मध्यांतरापर्यंत दोन्ही संघाचे प्रत्येक डावपेच अपयशी ठरताना दिसत होते.

तिसऱ्या सत्रात भारतीय खेळाडूंनी आक्रमणाची धार वाढवली. अखेरीस पेनल्टी कॉर्नरवर मिळालेल्या संधीचं सोनं करत वरुण कुमारने ४३ व्या मिनीटाला गोल करत कोंडी फोडली. परंतू भारताची ही आघाडी फारकाळ टिकू शकली नाही. अर्जेंटिनाकडून स्कूथ कॅसेलाने ४८ व्या मिनीटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करत संघाला बरोबरी मिळवून दिली.

हे वाचलं का?

दरम्यानच्या काळात भारताला पेनल्टी कॉर्नवर आणखी खूप संधी मिळाल्या. परंतू रुपिंदरपाल तिकडे गोल करण्यात अपयशी ठरला. सामना १-१ अशा बरोबरीत सुटणार असं वाटत असतानाच ५८ व्या मिनीटाला भारतीय खेळाडूंनी अर्जेंटिनाचा बचाव भेदत पेनल्टी एरियात प्रवेश केला. यावेळी रचलेल्या एका सुरेख चालीचा फायदा उचलत विवेक सागर प्रसादने गोल करत भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली.

अखेरच्या क्षणांमध्ये झालेल्या या गोलमुळे अर्जेंटिनाचा संघ बॅकफूटवर फेकला गेला. ५९ व्या मिनीटाला भारताला पेनल्टी कॉर्नरवर आणखीन एक संधी मिळाली. ज्यात हरमनप्रीत सिंगने गोल करत भारताची आघाडी ३-१ ने करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. साखळी फेरीत भारताचा अखेरचा सामना जपानसोबत होणार आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT