Rohit Sharma: विराटला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर रोहित म्हणाला, त्याच्यासारख्या…
Rohit Sharma: मुंबई: मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील कर्णधार म्हणून विराट कोहलीचा प्रवास आता संपुष्टात आला आहे. बुधवारी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) रोहित शर्माची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी वनडे टीमचा कर्णधार म्हणून नियुक्ती केली. त्यानंतर विराट आता टीम इंडियाकडून 50 आणि 20 षटकांच्या फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करताना दिसणार आहे. विराटला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर आता नवा कर्णधार रोहित […]
ADVERTISEMENT
Rohit Sharma: मुंबई: मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील कर्णधार म्हणून विराट कोहलीचा प्रवास आता संपुष्टात आला आहे. बुधवारी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) रोहित शर्माची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी वनडे टीमचा कर्णधार म्हणून नियुक्ती केली. त्यानंतर विराट आता टीम इंडियाकडून 50 आणि 20 षटकांच्या फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करताना दिसणार आहे.
ADVERTISEMENT
विराटला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर आता नवा कर्णधार रोहित शर्मानं याबाबत वक्तव्य केलं आहे. रोहितने एका मुलाखतीत सांगितले की, ‘भारतीय संघाला विराट कोहलीच्या दर्जाचे फलंदाज आणि नेतृत्व कौशल्याची खूप गरज आहे. कर्णधाराचे 20 टक्के काम मैदानावर असते आणि बाकीचे रणनीती बनवण्याचे असते.’.
बोरिया मजुमदारला दिलेल्या मुलाखतीत रोहित म्हणाला, ‘संघाला नेहमी विराट कोहलीसारख्या फलंदाजाची गरज असते. T20 फॉरमॅटमध्ये 50 पेक्षा जास्त सरासरी ही जबरदस्त आहे. त्याने अनेकवेळा भारताला संकटातून बाहेर काढले आहे.’
हे वाचलं का?
रोहित पुढे म्हणाला, ‘योग्य खेळाडू खेळत आहेत याची खात्री करणे हे कर्णधाराचे काम असते. योग्य संयोजन आहेत की नाही आणि काही तांत्रिक गोष्टी याकडे लक्ष ठेवावं लागेल. कर्णधाराने आपल्या कामगिरीतून बोलले पाहिजे अन्यथा इतर खेळाडूंचा आधार बनून त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे.’
रोहित म्हणाला, ‘मी हे म्हणत आहे कारण तो मागे राहून बदल घडवून आणू शकतो. तो सर्वांसोबत आहे याची मला खात्री आहे. म्हणूनच मी म्हणतो की, तो संघातील सर्वात महत्वाचा व्यक्ती असावा.’
ADVERTISEMENT
‘माझं काम बाहेर जास्त असेल. खेळाडूंना त्यांची जबाबदारी सोपवणे आणि ते मैदानावर अपेक्षा पूर्ण करतील अशी आशा आहे. तुमच्याकडे मैदानावर फक्त तीन तास आहेत. ज्यामध्ये जास्त बदल करता येत नाही कारण 11 खेळाडू खेळत असतात. मैदानावर फारसे बदल शक्य नाहीत.’ असंही रोहित यावेळी म्हणाला.
ADVERTISEMENT
रोहितने आयपीएलमध्ये पाचवेळा विजेतेपद पटकावले आहे, पण त्याचे म्हणणे आहे की, संघ व्यवस्थापनाने एक मजबूत संघ तयार केला असून या कामगिरीत त्याची भूमिका कमी असल्याचे तो म्हणतो. गेल्या तीन आयसीसी टूर्नामेंटमध्ये (2017 चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल, 2019 वर्ल्ड कप सेमीफायनल आणि या वर्षीचा T20 वर्ल्ड कप) कुठे चूक झाली हे मी सांगू शकत नाही. असेही तो म्हणाला.
रोहितने आयपीएलमध्ये पाचवेळा विजेतेपद पटकावले आहे, पण त्याचे म्हणणे आहे की, संघ व्यवस्थापनाने एक मजबूत संघ तयार केला असून या कामगिरीत त्याची भूमिका कमी असल्याचे तो म्हणतो. गेल्या तीन आयसीसी टूर्नामेंटमध्ये (2017 चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल, 2019 वर्ल्ड कप सेमीफायनल आणि या वर्षीचा T20 वर्ल्ड कप) कुठे चूक झाली हे मी सांगू शकत नाही. असेही तो म्हणाला.
Rohit Sharma ODI Captain: टी-20 नंतर वनडेचं कॅप्टन पदही रोहित शर्माकडे, कोहलीला आणखी एक धक्का
रोहित म्हणाला, ‘आम्ही सुरुवातीच्या टप्प्यात हरलो. मला वाटतं की, आम्ही तीन विकेट आणि दहा धावा अशा परिस्थितीसाठी देखील तयार राहायला हवं. त्यानंतरच्या फलंदाजांनी तयार राहावे. 10 धावांत तीन गडी गमावल्यानंतर आपण 190 धावा करू शकत नाही, असे कुठेही लिहिलेले नाही.’
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT