IPL 2021 : KKR पाठोपाठ CSK च्या गोटात कोरोनाचा शिरकाव, ३ सदस्यांना झाली लागण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आयपीएलच्या चौदाव्या हंगामा मध्यावधीवर येत असताना खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याच्या घटना समोर यायला सुरुवात झाली आहे. KKR नंतर CSK च्या गोटात कोरोनाने शिरकाव केला असून संघातले ३ सदस्य कोरोना पॉजिटीव्ह आढळले आहेत. सुदैवाने हे तिन्ही सदस्य खेळाडू नाहीयेत.

ADVERTISEMENT

RCB vs KKR IPL 2021: IPL मधील आजची मॅच रद्द, दोन क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण

चेन्नई सुपरकिंग्जचे CEO काशी विश्वनाथन, बॉलिंग कोच लक्ष्मीपती बालाजी आणि संघाला मैदानात ने-आण करणाऱ्या बसचा क्लिनर यांना कोरोनाची लागण झाली आहे. ESPNCricinfo ने मिळालेल्या संघातील इतर सदस्य आणि खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आलेला आहे. रवीवारी करण्यात आलेल्या चाचणीनंतर संघातील ३ सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय.

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार काशी विश्वनाथन, बालाजी आणि बसला क्लिनरने सोमवारी सकाळी पुन्हा एकदा कोरोनाची चाचणी दिली आहे. अनेकदा रुग्णामध्ये कोणतीही लक्षणं आढळत नसतानाहगी त्यांचे रिपोर्ट पॉजिटीव्ह येतात. सोमवारी करण्यात येणाऱ्या चाचणीचा अहवालही पॉजिटीव्ह आला तर या तिन्ही सदस्यांना १० दिवस बायो सिक्युअर बबलमध्ये तयार करण्यात आलेल्या आयसोलेशन विभागात रहावं लागणार आहे. यानंतर या तिन्ही सदस्यांनी कोरोना चाचणी करण्यात येईल, ही चाचणी निगेटीव्ह आल्यानंतरच त्यांना बायो बबलमध्ये स्थान मिळेल.

KKR च्या संघातील वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर बीसीसीआयने आज होणारा KKR vs RCB सामना पुढे ढकलला आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतात कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात अनेकांनी आयपीएलचे सामने रद्द करण्याची मागणी केली होती. ५ खेळाडूंनी आयपीएलचा चौदावा हंगाम मध्यावरच सोडून माघार घेतली.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT