IPL 2021 : विराट कोहलीला १२ लाखांचा दंड, Over Rate कायम न राखल्यामुळे शिक्षा
आयपीएलच्या चौदाव्या हंगामात पहिल्या पराभवाचा सामना करणाऱ्या विराट कोहलीला नियमांचा भंग केल्याप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली आहे. षटकांची गती कायम न राखल्याप्रकरणी विराट कोहलीला १२ लाखांचा दंड सुनावण्यात आला आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जने RCB ला ६९ रन्सने हरवलं. बाबर आझमकडून विराट कोहलीला धोबीपछाड, T20I Cricket मध्ये अनोख्या विक्रमाची नोंद दरम्यान, महेंद्रसिंग धोनीने […]
ADVERTISEMENT
आयपीएलच्या चौदाव्या हंगामात पहिल्या पराभवाचा सामना करणाऱ्या विराट कोहलीला नियमांचा भंग केल्याप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली आहे. षटकांची गती कायम न राखल्याप्रकरणी विराट कोहलीला १२ लाखांचा दंड सुनावण्यात आला आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जने RCB ला ६९ रन्सने हरवलं.
ADVERTISEMENT
बाबर आझमकडून विराट कोहलीला धोबीपछाड, T20I Cricket मध्ये अनोख्या विक्रमाची नोंद
दरम्यान, महेंद्रसिंग धोनीने टॉस जिंकत पहिल्यांदा बॅटींगचा निर्णय घेतला. ऋतुराज गायकवाड आणि फाफ डु-प्लेसिस यांनी पहिल्या विकेटसाठी आश्वासक भागीदारी करत चेन्नईला चांगली सुरुवात करुन दिली. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी ७४ रन्सची पार्टनरशीप केल्यानंतर चहलने गायकवाडला आऊट केलं, ऋतुराजने ३३ रन्स केल्या. दुसऱ्या बाजूने फाफ डु-प्लेसिसने आपलं अर्धशतक पूर्ण करत चेन्नईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. हर्षल पटेलने एकाच ओव्हरमध्ये सुरेश रैना आणि फाफ डु-प्लेसिसची विकेट घेत चेन्नईला बॅकफूटला ढकललं.
हे वाचलं का?
चांगली सुरुवात केल्यानंतरही मधल्या ओव्हर्समध्ये RCB च्या बॉलर्सनी दमदार पुनरागमन केलं. परंतू अखेरपर्यंत मैदानावर तळ ठोकून बसलेल्या रविंद्र जाडेजाने हर्षल पटेलच्या ओव्हरमध्ये ५ सिक्सची आतिषबाजी करत ३७ रन्स कुटल्या. या जोरावर चेन्नईने १९१ रन्सचा टप्पा गाठला.
प्रत्युत्तरादाखल RCB ची सुरुवात चांगली झाली. विराट कोहली आणि देवदत पडीक्कल यांनी पहिल्या विकेटसाठी ४४ रन्सची पार्टनरशीप केली. सॅम करनने विराट कोहलीला आऊट करत RCB ला पहिला धक्का दिला. यानंतर शार्दुल ठाकूरने फॉर्मात असलेल्या देवदत पडीक्कलला ३४ रन्सवर आऊट करत चेन्नईला आणखी एक यश मिळवून दिलं. यानंतर RCB च्या डावाला गळती लागली. ग्लेन मॅक्सवेल आणि जेमिन्सनचा अपवाद वगळता मधल्या फळीतला एकही बॅट्समन आश्वासक खेळी करु शकला नाही. अखेरीस ६९ रन्सनी सामना जिंकत चेन्नईने RCB ला चौदाव्या हंगामात पहिल्यांदा पराभवाचा धक्का दिला.
ADVERTISEMENT
IPL 2021 : जाडेजाची फटकेबाजी, Purple Cap Holder हर्षल पटेलच्या नावावर नकोसा विक्रम
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT