लोकांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाहीयेत आणि Team Owners एवढा पैसा खर्च करतायत? – अँड्रू टायची टीका

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

एकीकडे भारतात कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती गंभीर होत असताना आयपीएलच्या चौदाव्या हंगामातून खेळाडू माघार घेत आहेत. आतापर्यंत ५ खेळाडूंना आयपीएलचा हंगाम अर्ध्यावर सोडून आपल्या परिवारासोबत राहणं पसंत केलंय. राजस्थान रॉयल्स संघाचा ऑस्ट्रेलियन खेळाडू अँड्रू टायनेही काही दिवसांपूर्वी खासगी कारण देत स्पर्धेतून माघार घेतली. ऑस्ट्रेलियात पोहचलेल्या अँड्रू टायने भारतात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल आपलं परखड मत व्यक्त केलंय.

ADVERTISEMENT

IPL 2021 Explainer : खेळ महत्वाचा की जीव, जाणून घ्या खेळाडू स्पर्धेतून का घेत आहेत माघार?

“मी जेव्हा भारतीयांच्या दृष्टीकोनातून विचार करायला गेलो, तर एकीकडे लोकांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नसताना टीम ओनर्स आणि या सर्व कंपन्या एवढा खर्च कसा काय करत आहेत? पण सध्याच्या काळात जर लोकांवर असलेला ताण कमी करण्यासाठी क्रीडा स्पर्धा सुरु ठेवणं योग्य असेल तर त्या सुरु रहाव्यात. पण हा सर्वांचा विचार असू शकत नाही. पण मी सर्वांच्या मताचा आदर करतो.” क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत अँड्रू टायने आपलं मत मांडलं.

हे वाचलं का?

आयपीएलच्या चौदाव्या हंगामात अँड्रू टायने आतापर्यंत फक्त एक सामना खेळला. भारतात कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता ऑस्ट्रेलियन सरकारने सध्या हवाई वाहतूकीवर काही निर्बंध घातले आहेत. भविष्यात ऑस्ट्रेलियन सरकार हवाई वाहतूक बंद करण्याच्या विचारात असल्याचंही कळतंय. अशा परिस्थितीत अनेक ऑस्ट्रेलियन खेळाडू आपल्या घरी परतण्याला प्राधान्य देत आहेत.

दिलदार पॅट कमिन्स ! करोनाविरुद्ध लढाईत पंतप्रधान सहायता निधीला भरघोस मदत

ADVERTISEMENT

संघासोबत बायो सिक्युअर बबलमद्ये असताना आपण सूखरुप होतो, पण किती काळ ही परिस्थिती कायम राहिली याचा अंदाज कोणालाच देता येत नाही. तसेच ऑस्ट्रेलियातही काही शहरांत बाहेरुन येणाऱ्या लोकांना क्वारंटाइन केलं जात आहे…ही सर्व परिस्थिती पाहता मी स्पर्धेतून माघार घेण्याचं ठरवलं असं टायने स्पष्ट केलं. अँड्रू टाय व्यतिरीक्त ऑस्ट्रेलियाच्या केन रिचर्डसन आणि अॅडम झॅम्पा यांनीही स्पर्धेतून माघार घेतली आहे. तर जोश हेजलवूडने स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच माघार घेतली होती. भारताच्या रविचंद्रन आश्विननेही कोविड काळात आपल्या परिवारासोबत राहण्यासाठी स्पर्धेतून माघार घेतली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT