IPL 2021 : लिनच्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईची १५९ पर्यंत मजल, RCB ला तुलनेत सोपं आव्हान

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आयपीएलच्या चौदाव्या सिझनमध्ये सलामीचा सामना खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने २० ओव्हर्स अखेरीस ९ विकेट गमावत १५९ पर्यंत मजल मारली आहे. ख्रिस लिन, सूर्यकुमार यादव, इशान किशन यांच्या फटकेबाजीच्या जोरावर गतविजेत्या मुंबईने इथपर्यंत मजल मारली. चांगल्या सुरुवातीनंतर RCB च्या बॉलर्सनी अखेरच्या स्पेलमध्ये भेदक मारा करत मुंबईच्या स्कोअर लाईनला अंकुश लावला.

ADVERTISEMENT

टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय RCB ने घेतला. रोहित शर्माने आपल्या नेहमीच्या शैलीत सुरुवात केली. परंतू चहलच्या बॉलिंगवर चोरटी रन घेण्याच्या प्रयत्न रोहित रनआऊट झाला. यानंतर लिनने सूर्यकुमार यादवच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी ७० रन्सची पार्टनरशीप केली. यावेळी दोन्ही बॅट्समननी RCB च्या स्पिनर्सवर चांगलाच हल्लाबोल केला. जेमिन्सनने सूर्यकुमार यादवला आऊट करत मुंबईची जोडी फोडली आणि मुंबईच्या धावगतीला अंकुश बसला.

यानंतर ख्रिस लिनने फटकेबाजीचा प्रयत्न केला खरा, इशान किशनसोबत त्याने छोटेखानी पार्टनरशीपही केली. परंतू विराट कोहलीने १२ व्या ओव्हरमध्ये बॉलिंगमध्ये बदल करत वॉशिंग्टन सुंदरला संधी दिली आणि त्याने लिनला ४९ रन्सवर आऊट केलं. लिनने ३५ बॉलमध्ये ४ फोर आणि ३ सिक्सच्या मदतीने ४९ रन्स केल्या. यानंतर ठराविक अंतराने मुंबईचे बॅट्समन आऊट होत राहिले. अखेरीस २० व्या ओव्हरअखेरीस मुंबई इंडियन्सचा संघ १५९ पर्यंत मजल मारु शकला. RCB कडून हर्षल पटेलने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT