IPL 2021 : आमच्यासाठी Charter Plane ची सोय करा – ख्रिस लिनचं क्रिकेट ऑस्ट्रेलियाला साकडं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भारतात कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन काही ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी आयपीएलमधून माघार घेतली आहे. देशात कोरोनामुळे परिस्थिती बिकट होत असताना आयपीएलचे सामने भरवणं कितपत योग्य असा प्रश्न विचारला जात आहे. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाचा खेळाडू ख्रिस लिनने यंदाची स्पर्धा संपल्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंसाठी क्रिकेट बोर्डाने चार्टर्ड विमानाची सोय करावी अशी मागणी केली आहे. ख्रिस लिन आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचं प्रतिनिधीत्व करतो.

ADVERTISEMENT

“मी क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अधिकाऱ्यांना स्पर्धा संपल्यानंतर आमच्यासाठी चार्टर्ड विमानाची सोय करण्याबद्दल मेसेज केला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाला प्रत्येक खेळाडूच्या करारातले १० टक्के मिळतात. त्यामुळे त्या पैशांमधून स्पर्धा संपल्यानंतर आमच्यासाठी चार्टर्ड विमानाची सोय होईल का असं मी विचारलं आहे.” ख्रिस लिन News Corp Media शी बोलत होता.

IPL 2021 Explainer : खेळ महत्वाचा की जीव, जाणून घ्या खेळाडू स्पर्धेतून का घेत आहेत माघार?

हे वाचलं का?

मला कल्पना आहे की अनेक लोकांची परिस्थिती सध्या गंभीर आहे, ते खडतर काळातून जात आहेत. परंतू भारतात आम्ही अत्यंत कठोर अशा बायो सिक्युअर बबल मध्ये वावरत आहोत. पुढच्या आठवड्यात आम्हाला लस दिली जाणार आहे…त्यामुळे आमच्यासाठी स्पर्धा संपल्यानंतर चार्डर्ड विमानाची सोय केली जाईल अशी मला आशा असल्याचं लिनने स्पष्ट केलं. ऑस्ट्रेलियन सरकारने भारतात कोरोनाची परिस्थिती पाहता हवाई वाहतूकीवर काही निर्बंध घातले आहेत. येणाऱ्या काळात ऑस्ट्रेलियन सरकार भारतामधून हवाई वाहतूक बंद करण्याच्या विचारात आहे. अशा परिस्थितीत काही ऑस्ट्रेलियन खेळाडू आपल्या मायदेशी परतण्यासाठी आतूर असल्याचं कळतंय.

लोकांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाहीयेत आणि Team Owners एवढा पैसा खर्च करतायत? – अँड्रू टायची टीका

ADVERTISEMENT

ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर आणि KKR चा खेळाडू पॅट कमिन्सनेही भारतामधील परिस्थितीचा अंदाज घेत पंतप्रधान सहायता निधीला ५० हजार डॉलर्सची मदत केली आहे. आतापर्यंत जोश हेजलवूड, केन रिचर्डसन, अॅडम झॅम्पा, अँड्रू टाय यांनी स्पर्धेतून माघार घेतली आहे.

ADVERTISEMENT

दिलदार पॅट कमिन्स ! करोनाविरुद्ध लढाईत पंतप्रधान सहायता निधीला भरघोस मदत

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT