IPL 2021 : नितीश राणाची दुसरी कोरोना चाचणी निगेटीव्ह, KKR च्या ट्रेनिंग कँपमध्ये सहभागी व्हायला परवानगी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

देशात प्रत्येक दिवशी वाढत असलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने ९ एप्रिलपासून आयपीएलच्या चौदाव्या सिझनची घोषणा केली आहे. या स्पर्धेसाठी सर्व टीम्सचे कँप सुरु झाले असून सर्व खेळाडू Bio Secure Bubble मध्ये गेले आहेत. अशा परिस्थितीत कोलकाता नाईट रायडर्सच्या संघातील महत्वाचा खेळाडू नितीश राणाला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. गोव्याला फिरायला गेलेला असताना नितीशला पहिल्यांदा कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. नितीशचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर तो मुंबईतील हॉटेलमध्ये क्वारंटाइन झाला.

ADVERTISEMENT

IPL 2021 Explainer : ऋषभकडे दिल्ली कॅपिटल्सची कॅप्टन्सी, निर्णय किती बरोबर किती चूक?

यानंतर काही दिवसांनी नितीशची पुन्हा कोरोना चाचणी करण्यात आली, ज्यात त्याचा अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर अखेरीस त्याला ट्रेनिंग कँपमध्ये सहभागी होण्याची परवानगी मिळाली आहे. ९ एप्रिलपासून सुरु होणाऱ्या चौदाव्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सचा पहिला सामना ११ एप्रिलला सनराईजर्स हैदराबादविरुद्ध होणार आहे. कोलकात्याच्या दृष्टीकोनातून नितीश राणा हा महत्वाचा खेळाडू आहे.

हे वाचलं का?

नितीशने आतापर्यंत आयपीएलमध्ये ६० सामने खेळले असून २८.१७ च्या सरासरीने त्याने १ हजार ४३७ रन्स केल्या आहेत. १३५ च्या स्ट्राईक रेटने खेळणाऱ्या नितीश राणाच्या नावावर आयपीएलमध्ये ११ अर्धशतक जमा असून ८७ हा त्याचा आयपीएलमधला सर्वोच्च स्कोअर आहे. आयपीएलच्या तेराव्या सिझनमध्ये नितीश राणाने १४ सामन्यांमध्ये २५.१४ च्या सरासरीने ३५२ रन्स बनवल्या होत्या. त्यामुळे सनराईजर्स हैदराबादविरुद्ध पहिल्या सामन्यात नितीश राणाला संघात संधी मिळते की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

IPL 2021 : स्पर्धेआधीच ऑस्ट्रेलियन प्लेअरची माघार, SRH च्या ताफ्यात धडाकेबाज खेळाडूची एंट्री

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT