IPL 2021 : कोरोनाविरुद्ध लढ्यात राजस्थान रॉयल्सचं मोठं योगदान, ७.५ कोटींची आर्थिक मदत
भारतात कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती बिकट होत असताना, आयपीएलच्या सामन्यांचं आयोजन करावं का यावरुन गेल्या काही दिवसांमध्ये बराच उहापोह सुरु आहे. एकीकडे खेळाडू स्पर्धा अर्ध्यावर सोडून माघारी परतत असताना राजस्थान रॉयल्स संघाने एक वेगळं उदाहरण घालून दिलंय. राजस्थान रॉयल्स संघाने कोरोनाविरुद्ध लढण्यात भारतामधील आरोग्य यंत्रणांना ७.५ कोटींची मदत जाहीर केली आहे. Rajasthan Royals announce a […]
ADVERTISEMENT

भारतात कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती बिकट होत असताना, आयपीएलच्या सामन्यांचं आयोजन करावं का यावरुन गेल्या काही दिवसांमध्ये बराच उहापोह सुरु आहे. एकीकडे खेळाडू स्पर्धा अर्ध्यावर सोडून माघारी परतत असताना राजस्थान रॉयल्स संघाने एक वेगळं उदाहरण घालून दिलंय. राजस्थान रॉयल्स संघाने कोरोनाविरुद्ध लढण्यात भारतामधील आरोग्य यंत्रणांना ७.५ कोटींची मदत जाहीर केली आहे.
ADVERTISEMENT
Rajasthan Royals announce a contribution of over $1 milion from their owners, players and management to help with immediate support to those impacted by COVID-19. This will be implemented through @RoyalRajasthanF and @britishasiantst.
Complete details ?#RoyalsFamily
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 29, 2021
राजस्थान रॉयल्स संघाचे मालक, खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांनी पुढे येऊन या मदतनिधीसाठी आपलं योगदान दिलं आहे. काही दिवसांपूर्वी KKR चा फास्ट बॉलर पॅट कमिन्स आणि कॉमेंट्रेटर ब्रेट ली ने देखील केंद्र सरकारला कोरोनाविरुद्ध लढाईत आर्थिक मदत जाहीर केली होती.
कमिन्सपाठोपाठ ब्रेट ली ची भारताला मदत, कोरोनाविरुद्ध लढाईसाठी दिलं आर्थिक पाठबळ
हे वाचलं का?
दरम्यान, कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती, संभ्रमाच्या वातावरणामुळे परदेशी खेळाडूंमध्ये निर्माण झालेली बेचैनी पाहता…बीसीसीआयने सीईओ हेमांग अमिन यांनी आठही संघमालकांना विशेष पत्र लिहीलं आहे. या पत्रात प्रत्येक खेळाडूला स्पर्धा संपल्यानंतर त्याच्या घरी सुखरुप पोहचवण्यात येईल असं आश्वासन दिलं आहे. खेळाडूच नव्हे तर स्पर्धेसाठीचे कॉमेंट्रेटर्स, अंपायर्स व इतर कर्मचाऱ्यांनाही स्पर्धेनंतर सुखरुप घरी पोहचवण्याची व्यवस्था निर्माण केली जाईल अशी खात्री हेमांग अमिन यांनी दिली आहे.
IPL 2021 Explainer : खेळ महत्वाचा की जीव, जाणून घ्या खेळाडू स्पर्धेतून का घेत आहेत माघार?
ADVERTISEMENT
काय म्हणाले आहेत हेमांग अमिन?
ADVERTISEMENT
तुमच्यापैकी अनेकांना स्पर्धा संपल्यानंतर घरी परत कसं जायचं याबद्दल मनात अनेक शंका आणि प्रश्न असतील. सध्याची परिस्थिती पाहता असे विचार मनात येणं साहजीक आहे. पण तुम्हाला कसलीही काळजी करायची गरज नाही, याची खात्री आम्ही देतो. स्पर्धा संपल्यानंतर तुम्ही सर्वजण घरी योग्य पद्धतीने सुखरुप पोहचाल यासाठी बीसीसीआय सर्वकाही करेल. सध्याच्या परिस्थितीवर आम्ही बारीक नजर ठेवून आहोत, तसेच स्पर्धा संपल्यानंतर तुम्हाला घरी पोहचवण्यासाठी प्रत्येक सरकारी यंत्रणा आणि अधिकाऱ्यांसोबत आमच्या चर्चा सुरु आहेत. तुमच्यापैकी प्रत्येक जण घरी सुखरुप पोहचेपर्यंत ही स्पर्धा आमच्यासाठी संपलेली नसेल.
दरम्यान दोन अंपायर्सव्यतिरीक्त आतापर्यंत जोश हेजलवूड, अँड्रू टाय, केन रिचर्डसन, अॅडम झॅम्पा आणि रविचंद्रन आश्विन या खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT