IPL 2021 : गुडघ्याच्या दुखापतीमुळे नटराजन स्पर्धेला मुकणार
सलग तीन पराभवानंतर पहिला विजय मिळवणाऱ्या सनराइजर्स हैदराबाद संघासमोरच्या अडचणी अजुनही कायम आहेत. संघाचा महत्वाचा डावखुरा बॉलर टी. नटराजन गुडघ्याच्या दुखापतीमुळे यंदाचा संपूर्ण सिझन खेळू शकणार नाहीये. View this post on Instagram A post shared by SunRisers Hyderabad (@sunrisershyd) ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना नटराजनच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. यानंतर नटराजनने या दुखापतीवर उपचारही घेतले. परंतू आयपीएलच्या […]
ADVERTISEMENT
सलग तीन पराभवानंतर पहिला विजय मिळवणाऱ्या सनराइजर्स हैदराबाद संघासमोरच्या अडचणी अजुनही कायम आहेत. संघाचा महत्वाचा डावखुरा बॉलर टी. नटराजन गुडघ्याच्या दुखापतीमुळे यंदाचा संपूर्ण सिझन खेळू शकणार नाहीये.
ADVERTISEMENT
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना नटराजनच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. यानंतर नटराजनने या दुखापतीवर उपचारही घेतले. परंतू आयपीएलच्या चौदाव्या हंगामात या दुखापतीने पुन्हा एकदा उचल घेतली आहे. आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये नटराजन फक्त दोन सामने खेळला आहे, कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या संघांविरुद्ध सामना खेळल्यानंतर नटराजन संघाबाहेर गेला…ज्यानंतर खलिल अहमदला संघात स्थान देण्यात आलं.
मिळालेल्या माहितीनुसार नटराजनच्या गुडघ्याला झालेल्या दुखापतीचं पुन्हा एकदा मेडीकल स्कॅनिंग करणं गरजेचं आहे. परंतू यासाठी नटराजनला संघाचं Bio Secure Bubble मोडावं लागणार आहे. याच कारणासाठी हैदराबादच्या संघ व्यवस्थापनाने नटराजनच्या रिप्लेसमेंटबद्दल अद्याप निर्णय घेतलेला नाहीये.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT