IPL 2021 : प्लेअर्स पाठोपाठ दोन अंपायर्सचीही स्पर्धेतून माघार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भारतात एकीकडे कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती बिकट होत असताना आयपीएलचे सामने खेळवणं गरजेचं आहे का असा वाद गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. आतापर्यंत ५ खेळाडूंनी कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहून स्पर्धेतून माघारही घेतली. आता या यादीमध्ये दोन अंपायर्सचं नाव जोडलं गेलंय. ICC च्या एलिट पॅनलचे दोन अंपायर नितीन मेनन आणि पॉल राफेल यांनी स्पर्धा मध्यावर सोडण्याचं ठरवलंय.

ADVERTISEMENT

दर दोन दिवसांनी टेस्टिंग, बाहेरील जेवणाला परवानगी नाही; BCCI कडून Bio Secure Bubble चे नियम अधिक कडक

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीनुसार अंपायर नितीन मेनन यांची पत्नी आणि आईला कोरोनाची लागण झाली आहे, तर पॉल राफेल यांनी ऑस्ट्रेलियन सरकारने विमानसेवा बंद केल्यानंतर घरी परता येणार नाही या भितीमधून माघार घेतल्याचं कळतंय. “नितीन मेनन यांना लहान मुल आहे, पत्नी आणि आईला कोरोनाची लागण झाल्यानंतर मुलाची काळजी घेण्यासाठी परिवारासोबत असणं गरजेचं वाटल्यामुळे त्यांनी माघार घेतली आहे. पॉल राफेल यांनीही स्पर्धा मध्यावरच सोडण्याचं ठरवलंय. या दोन्ही अंपायर्सच्या बदल्यात बीसीसीआयने स्थानिक अंपायर्सचा बॅकअप ऑप्शन ठेवला आहे.” BCCI मधील सूत्रांनी एक्स्प्रेसला माहिती दिली.

हे वाचलं का?

कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती, संभ्रमाच्या वातावरणामुळे परदेशी खेळाडूंमध्ये निर्माण झालेली बेचैनी पाहता…बीसीसीआयने सीईओ हेमांग अमिन यांनी आठही संघमालकांना विशेष पत्र लिहीलं आहे. या पत्रात प्रत्येक खेळाडूला स्पर्धा संपल्यानंतर त्याच्या घरी सुखरुप पोहचवण्यात येईल असं आश्वासन दिलं आहे. खेळाडूच नव्हे तर स्पर्धेसाठीचे कॉमेंट्रेटर्स, अंपायर्स व इतर कर्मचाऱ्यांनाही स्पर्धेनंतर सुखरुप घरी पोहचवण्याची व्यवस्था निर्माण केली जाईल अशी खात्री हेमांग अमिन यांनी दिली आहे.

IPL 2021 Explainer : खेळ महत्वाचा की जीव, जाणून घ्या खेळाडू स्पर्धेतून का घेत आहेत माघार?

ADVERTISEMENT

काय म्हणाले आहेत हेमांग अमिन?

ADVERTISEMENT

तुमच्यापैकी अनेकांना स्पर्धा संपल्यानंतर घरी परत कसं जायचं याबद्दल मनात अनेक शंका आणि प्रश्न असतील. सध्याची परिस्थिती पाहता असे विचार मनात येणं साहजीक आहे. पण तुम्हाला कसलीही काळजी करायची गरज नाही, याची खात्री आम्ही देतो. स्पर्धा संपल्यानंतर तुम्ही सर्वजण घरी योग्य पद्धतीने सुखरुप पोहचाल यासाठी बीसीसीआय सर्वकाही करेल. सध्याच्या परिस्थितीवर आम्ही बारीक नजर ठेवून आहोत, तसेच स्पर्धा संपल्यानंतर तुम्हाला घरी पोहचवण्यासाठी प्रत्येक सरकारी यंत्रणा आणि अधिकाऱ्यांसोबत आमच्या चर्चा सुरु आहेत. तुमच्यापैकी प्रत्येक जण घरी सुखरुप पोहचेपर्यंत ही स्पर्धा आमच्यासाठी संपलेली नसेल.

दरम्यान दोन अंपायर्सव्यतिरीक्त आतापर्यंत जोश हेजलवूड, अँड्रू टाय, केन रिचर्डसन, अॅडम झॅम्पा आणि रविचंद्रन आश्विन या खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT