IPL 2022 Mega Auction : अहमदाबादच्या संघाला मिळाले नवीन शिलेदार, हार्दिक-राशिद खान,शुबमनला संधी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आयपीएलच्या आगामी हंगामासाठी अहमदाबादच्या संघाने आपल्या तीन खेळाडूंची निवड केल्याचं कळतंय. हार्दिक पांड्या, राशिद खान आणि शुबमन गिल या तिघांना आगामी हंगामापासून संघात संधी मिळणार असल्याचं कळतंय. ESPNCricinfo ने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

ADVERTISEMENT

डिसेंबर महिन्यात पार पडलेल्या संघाच्या लिलावामध्ये CVC कॅपिटल्स कंपनीने अहमदाबाद संघाची खरेदी केली होती. भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक गॅरी कस्टर्न आणि माजी गोलंदाज आशिष नेहरा अहमदाबादच्या संघाला मार्गदर्शन करणार आहेत. इंग्लंडचा माजी सलामीवीर विक्रम सोळंकी हा संघाचा संचालक म्हणून काम पाहणार आहे.

IPL 2022 Mega Auction : लोकेश राहुल, बिश्नोई आणि स्टॉयनिस ‘लखनऊ’च्या दरबारात दाखल

हे वाचलं का?

आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने अहमदाबाद आणि लखनऊ संघांना ड्राफ्टमधील ३ खेळाडूंची निवड करताना १५ कोटी, ११ कोटी आणि ७ कोटी असा टप्पा घालून दिला होता. ESPNCricinfo ने दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबादच्या संघाने हार्दिक आणि राशिद खान या दोघांनाही १५ कोटींची रक्कम दिल्याचं कळतंय. शुबमन गिलला ७ कोटींचं मानधन देण्यात आलं असून हार्दिक पांड्याकडे अहमदाबाद संघाचं नेतृत्व येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तीन खेळाडूंच्या निवडीनंतर फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या मेगा ऑक्शनमध्ये अहमदाबाद संघाकडे ५३ कोटींची रक्कम बाकी राहणार आहे. हार्दिक पांड्याने याआधी मुंबई इंडियन्स तर राशिद खानने हैदराबादचं प्रतिनिधीत्व केलं आहे. हे दोन्ही खेळाडू एकाच संघातून खेळण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. राशिद खानने हैदराबादकडून खेळताना आपली कारकिर्द गाजवली असली तरीही हार्दिक पांड्याचा ढासळणारा फॉर्म हा चिंतेचा विषय होता. त्यामुळे नवीन संघात हार्दिक पांड्या कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT