IPL 2022 Auction : Hugh Edmeades अचानक खाली कसे कोसळले? जाणून घ्या वैद्यकीय कारण…
आयपीएलच्या पंधराव्या हंगामाच्या लिलावादरम्यान सर्वांच्या काळजाचा ठोका चुकवणारा एक प्रसंग घडला. बंगळुरुत लिलावादरम्यान ऑक्शनर ह्यू एडमीस हे भोवळ येऊन खाली कोसळल्यामुळे लिलाव थांबवण्यात आला. या घटनेनंतर एडमीस यांच्यावर तात्काळ उपचार करण्यात आले, ज्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं कळतंय. आयपीएलने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एडमीस यांना नेमकं काय झालं याची माहिती दिली आहे. postural hypotension […]
ADVERTISEMENT
आयपीएलच्या पंधराव्या हंगामाच्या लिलावादरम्यान सर्वांच्या काळजाचा ठोका चुकवणारा एक प्रसंग घडला. बंगळुरुत लिलावादरम्यान ऑक्शनर ह्यू एडमीस हे भोवळ येऊन खाली कोसळल्यामुळे लिलाव थांबवण्यात आला. या घटनेनंतर एडमीस यांच्यावर तात्काळ उपचार करण्यात आले, ज्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं कळतंय.
ADVERTISEMENT
आयपीएलने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एडमीस यांना नेमकं काय झालं याची माहिती दिली आहे.
postural hypotension म्हणजे काय?
हे वाचलं का?
सोप्या वैद्यकीय भाषेत, जर तुम्ही एकाच पोजिशनमध्ये सातत्याने बसून किंवा उभे असाल आणि काही कालावधीने तुमच्या शरिराच्या हालचालींमध्ये बदल होतो त्यावेळी तुमचं ब्लडप्रेशर खाली जातं. ज्यामुळे व्यक्तीला चक्कर येण्याची शक्यता असते. यालाच postural hypotension म्हणतात.
IPL 2022 Auction: लिलावादरम्यान कोसळलेले Hugh Edmeades कोण आहेत? जाणून घ्या त्यांच्याविषयी
ADVERTISEMENT
एडमीस हे दुपारी १२ वाजल्यापासून लिलावासाठी उभे होते. ज्यामुळे त्यांना हा त्रास जाणवल्याचं बोललं जातंय. सुदैवाने एडमीस यांची प्रकृती स्थिर असून त्यांना आजच्या दिवशी विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर प्रसिद्ध समालोचक चारु शर्मा ऑक्शन सांभाळणार आहेत.
ADVERTISEMENT
IPL 2022 : KKR ने सोडवला कॅप्टन्सीचा यक्षप्रश्न? १२ कोटींच्या बोलीवर श्रेयसला घेतलं संघात
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT